#FarmerProtest – आंदोलक थेट लालकिल्ल्यात घुसले, राजधानी दिल्लीत तणाव

Update: 2021-01-26 08:46 GMT

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला वेगळे वळण लागले आहे. काही आक्रमक आंदोलकांनी थेट आपला मोर्चा लाल किल्ल्याकडे वळवला आहे आणि एवढेच नाहीतर तिथल्या एका पोलवर या आंदोलकांनी संघटनेचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला तर आंदोलकांपैकी काहींनी दगडफेक केली.यात पोलीस जखमी झाले आहेत. त्यानंतर दुपारी काही आंदोलकांनी लाल किल्ल्याकडे आपला मोर्चा वळवला. लालकिल्ल्याच्या सुरक्षा भेदत हे आंदोलक थेट आत घुसले आणि किल्ल्याच्या दर्शनी भागावर असलेल्या पोलवर या आंदोलकांनी शेतकरी संघटनेचा ध्वज फडकावला.

Tags:    

Similar News