दिल्लीत शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, मोदी सरकारला इशारा

Update: 2022-08-22 11:50 GMT

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी ऐतिहासिक आंदोलन केले. पण सरकारच्या माघारीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. तसेच सरकारने पुढील काळात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. पण आता सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याचे सांगत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. भारतीय किसान युनियनने दिल्लीत जंतर मंतरवर हे आंदोलन केले.

दिल्ली शेतकरी आंदोलन, काय घडलं दिवसभरात?

हमीभावाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी संयुक्त किसान मोर्चाची राजधानी दिल्लीच्या जंतरमंतरवर किसान महापंचायत पार पडली. या महापंचायतीला शेतकरी नेत्यांची उपस्थिती फारशी पाहायला मिळाली नाही. शेतकरी नेते शिवकुमार कक्काजी यांच्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील शेतकरी या आंदोलनात उपस्थित होते. यावेळी शेतकरी नेते शिवकुमार कक्काजी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना आम्ही सरकारला आता 15 दिवसांचा कालावधी देत आहोत. जर 15 दिवसांच्या आत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही मोठं आंदोलन करु असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.

काय आहेत मागण्या?

देशातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जावं

शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

वीज विधेयक रद्द करावं.

केंद्र सरकारने आणलेली नवीन अग्नीपथ योजना मागे घ्यावी.

लखीमपूर खेरी हत्याकांडातील शेतकरी कुटुंबीयांना न्याय, तुरुंगात असलेल्या शेतकऱ्यांची सुटका आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना अटक

स्वामीनाथन आयोगाच्या C2+50 टक्के सूत्रानुसार एमएसपीची हमी देणारा कायदा करावा

ऊसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करून थकबाकी तातडीने द्यावी

जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडावे आणि सर्व मुक्त व्यापार करार रद्द करावेत

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत असलेली शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ द्यावी


दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनलेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ते या आंदोलनात पोहोचू शकले नाही.

Full View

Similar News