यंदाचे वर्ष शेतकरी आंदोलनाचे...

अल निनो आणि बायोफिएल चा कमोडिटी आणि खाद्य उद्योगावर परिणाम

Update: 2023-09-30 03:51 GMT

 आगामी वर्षात भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने भाववाढ रोखण्यासाठी सरकारकडून धोरण राबवले जाईल त्यामुळे स्थानिक खाद्यतेल उत्पादक आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले जाणार नाही, त्यातूनच वर्षभर शेतकरी आंदोलनाचा प्रभाव दिसेल असे आंतरराष्ट्रीय खाद्यतेल विश्लेषक दोराबजी मिस्त्री यांनी सांगितले.

Full View

अलनिनोचा परिणाम जगभरातील शेती क्षेत्रावर झाला असून बायोफिएलसाठी शेती उत्पादनांचा वापर वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम कमोडिटी आणि खाद्य उद्योगावर होणार असल्याचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय अभ्यासक दोराबजी मिस्त्री यांनी केलं.


जगभरातील खाद्यतेल उद्योजकांची ग्लोब ऑइल इंडिया 2023 परिषद सध्या मुंबईमध्ये सुरू असून जगभरातून खाद्यतेलाने कमोडिटी क्षेत्रातील तज्ञ उद्योजक आयात आणि निर्यातदार यामध्ये सहभागी झाले आहे.

जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार म्हणून भारत ओळखला जातो. आगामी काळात निवडणुकीच्या तोंडावर महागाई वाढू नये यासाठी भारताकडून खाद्यतेलाचा साठा करण्यात येणार आहे.जगातील सर्वात मोठ्या आयातदारामध्ये खाद्यतेलाचा साठा नोव्हेंबरमध्ये 3.37 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढणार आहे.

भारत 2023/24 वर्षाची सुरुवात खाद्यतेलाच्या विक्रमी आवक करेल ज्यामुळे नवीन हंगामातील आयात कमी होईल, असे एका उद्योग अधिकाऱ्याने सांगितले.

जगातील सर्वात मोठ्या आयातदारामध्ये खाद्यतेलाचा साठा 1 नोव्हेंबर रोजी 3.37 दशलक्ष मेट्रिक टनांवर जाण्याची शक्यता आहे, जे एका वर्षापूर्वी 2.46 दशलक्ष टन होते, असे GGN रिसर्चचे व्यवस्थापकीय भागीदार, नीरव देसाई, एक खाद्य तेल व्यापारी आणि दलाल यांनी सांगितले.

नवीन हंगामात भारताची खाद्यतेलाची आयात यंदाच्या 16.6 दशलक्ष टनांच्या विक्रमी आयातीवरून 15.8 दशलक्ष टनांवर येऊ शकते, असे त्यांनी या उद्योग परिषदेत सांगितले.

Globe oil 2023 परिषदेमध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानी उद्योजकांनी सांगितले,भारत आणि पाकिस्तान एकाच परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्येही मोठा चलनवाढीचा प्रचंड वेग असून खाद्यतेलाची मोठी आयात करणारा पाकिस्तान ठरल्याचे त्यांनी सांगितलं.

कोना हक म्हणाली, (Kona Haque, Head of research ED&F Man) जगात सर्वाधिक विकास दर भारताचा आहे. (India GDP 6.3%)चलनवाढ भारतासह जगभर आहे.चीनचा प्रगतीचा विकास घटत आहे.त्या विरोधात भारताचा विकास दर वाढत आहे.भारत ओपेक वरील अवलंबित्व कमी करून रशियाकडून जास्तीत जास्त आयात करत आहे.युक्रेनुद्धाचा फारसा परिणाम शेतमाला यादीवर झाला नाही असेही त्यांनी नमूद केले.

H.E. Mr. Jerry संभूआग इंडोनेशियाचे उपमंत्री यांनी परिषदेमध्ये सहभागी होताना युरोपीयन युनियनचा पाम ओईल वरील निर्बंध चुकीचे असल्याचे सांगितले.भारतात पाम ऑइल उत्पादनाची प्रयत्न पर्यावरणाचे कारणाच्या सांगून इंडोनेशिया मलेशियाला नियंत्रण करणं योग्य नाही..

भारतामध्ये ही इलेक्शन वर्ष असल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी ठेवण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळेच शेतकरी संघटना आक्रमक होऊन सरकार विरोधात आंदोलन देखील करू शकतात असा अंदाज यावेळी दोराबजी मिस्त्री यांनी व्यक्त केला.


Tags:    

Similar News