चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा: पिक विमा सहापट महागला

कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना शासनकृपेने पीक विम्याच्या बाबतीतही चिकू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.पंतप्रधान हंगामी पीक विमा योजनेत पालघर जिल्ह्यातील चिकू फळ पिकाला शेतकऱ्याच्या हिश्यात हेक्टरी सहा पटीने वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Update: 2021-06-18 13:50 GMT

पालघर जिल्ह्यातील चिकू पिकासाठी 1 जुलै ते 30 सप्टेंबर यादरम्यान दहा दिवस 90 टक्के पेक्षा जास्त आद्रता आणि आठ दिवस वीस मिलिमीटर सतत पाऊस असल्यास हेक्टरी साठ हजार रुपये तर पाच दिवस 90 टक्के पेक्षा जास्त आद्रता चार दिवस वीस मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास हेक्‍टरी 27 हजार रुपये विमा नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्याची योजना पंतप्रधान योजनेअंतर्गत 2021 खरीप हंगामासाठी मंजूर झाली आहे

चालू वर्षी रिलायन्स ग्रुपला हे काम देण्यात आले असून पालघर जिल्हातील शेतकऱ्यांसाठी चिकू बागायतदारांना हेक्टरी अठरा हजार रुपये इतका हिस्सा भरावा लागणार आहे तर केंद्र सरकार 7500 व राज्य सरकार पंचवीस हजार पाचशे रुपये हिस्सा भरणार आहे


मागच्या वर्षी किंवा त्यापूर्वी शेतकऱ्याचा हिस्सा फक्त तीन हजार रुपये इतका होता चालू हंगामात तो सहा पटीने वाढवून 18 हजार रुपये इतका झाला आहे इतर फळबागायती च्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात विक्री होणाऱ्या चिकू पिकाला अशाप्रकारे प्रचंड रकमेचा हिस्सा भरण्याची सक्ती करुन सरकार शेतकऱ्याचे की वीमा कंपनीच्या भल्यासाठी योजना राबवते काय असा प्रश्न महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी आणि बागायतदार प्रीत अनिल पाटील यांनी केला आहे. एकंदरीतच कोरोना संकटात तारणाऱ्या शेतकऱ्याला खासगीकरणाच्या षड्यंत्राखाली सध्या लुटण्याचे काम सुरू आहे.



Tags:    

Similar News