केंद्र सरकारचा तीन कायदे आणून शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराण्यांचे गुलाम करण्याचा प्रयत्न - राजू शेट्टी

केंद्र सरकार हे तीन कृषी कायदे मागे घेत नाही व FRP चा कायदा करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. देशातील सरकार हे कॉर्पोरेट घराण्यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहे. शेतकऱ्यांनी मागणी केली नसताना हे तीन कायदे आमच्यावर लादले जात आहेत. केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन हे कायदे लागू करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल त्यावेळी दिल्ली पेक्षा मोठा भडका महाराष्ट्रात उडल्याशिवाय राहणार नाही,असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले.

Update: 2021-01-16 15:36 GMT

देशातील सरकार हे कॉर्पोरेट घराण्यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहे. शेतकऱ्यांनी मागणी केली नसताना हे तीन कायदे आमच्यावर लादले जात आहेत. उसाला ज्याप्रमाणे FRP आहे त्यामुळे जर कारखानदारांनी FRP दिला नाही तर त्याच्यावर जप्ती येत. असाच कायदा मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, हरभरा यांना का नाही? मिळणार हमीभाव हा कायदेशीर करा अशीच आमची मागणी आहे. मात्र हा कायदा करायला सरकार तयार नाही. हे तीन कायदे आणून सरकार शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराण्यांचे गुलाम करण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. ते आज केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावी यासाठी मुंबई येथे करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी त्यांनी सगळे मुंबईकर आज रस्त्यावर आल्यामुळे ही लढाई एकट्याचे नसल्याचे समाधान वाटतं. जोपर्यंत सरकार हे तीन कृषी कायदे मागे घेत नाही व FRP चा कायदा करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील व सद्या राज्य सरकारने या तीनही कायद्यानं स्थगिती दिली आहे पण ज्या दिवशी केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन हे कायदे लागू करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल त्यावेळी दिल्ली पेक्ष्या मोठा भडका महाराष्ट्रात उडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील दिला.

ऊस उत्पादक शेतकरी हा संघटित आहे राजकीय दृष्ट्या जागृत आहे त्यामुळे राजकीय उलतापालत करण्याची त्यांची क्षमता आहे म्हणून ऊस उत्पादकांची कळ काढण्याची सरकारची हिम्मत होत नाही. आज इतर शेतकरी असंघटीत आहेत त्यांना संघटीत करून न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका असल्याचे शेट्टी यांनी सांगितलं.

Full View


Tags:    

Similar News