कडू कारले उत्पादनातून शेतकरी झाला लखपती...

पारंपरिक शेतीसोबतच भाजीपाल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फलदायी आहे..

Update: 2023-09-27 00:30 GMT

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील  शेतकऱ्याने कारल्याच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. लोहगाव येथील विठ्ठल सुंबनवाड या शेतकऱ्याने आपल्या शेतातील 30 गुंठ्यांत कारल्याची लागवड केलीय. सध्या या गावरानी कडू कारल्याला सध्या चांगला भाव मिळतोय. लोहगाव पासून जवळच असलेल्या नरसी येथे या कारल्याची विक्री ते करतात. दररोज 2 क्विंटल कारले ते बाजारात विक्री करतात. यातून सुबंनवाड यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. सुंबनवाड यांना कारले लागवडीसाठी 35 हजार रुपये खर्च आला.

सध्या बाजारात कारल्याला चांगला भाव मिळत असून जवळपास साडेतीन लाख रुपये या कारल्याच्या विक्रीतून मिळतील अशी अपेक्षा सुबंनवाड यांना आहे.पारंपरिक शेतीसोबतच भाजीपाल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फलदायी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच भाजीपाल्याची शेती करावी असा संदेश सुंबनवाड या शेतकऱ्याने दिलाय.

Full View


Tags:    

Similar News