द्राक्ष खरेदीत बांग्लादेशच्या आयात शुल्कात वाढ, शेतकऱ्याची झाली कोंडी

राज्यात शेतकरी दिवसेंदिवस पिचत चालला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. द्राक्ष खरेदीत बांग्लादेशच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Update: 2023-02-24 09:28 GMT

निफाड तालुक्यातील नैताळे येथील रवींद्र बोरगुडे या तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत द्राक्ष शेतीचे पीक घेण्याचे ठरवले. या शेतकऱ्याने द्राक्ष पीक घेतले मात्र दिवसेंदिवस द्राक्ष पिकाला लागणारा मजूर वर्गाचा अभाव तसेच रासायनिक खत, सततच्या बदलत्या हवामानाचा द्राक्षांना बसणार फटका यामुळे एक एकर द्राक्षाला जवळपास तीन लाख रुपये खर्च येत आहे. हा खर्च देखील निघणे आता अवघड झाल्याने द्राक्ष शेती ही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान बांग्लादेशने आयात शुल्क वाढवल्याने व्यापारी वर्ग देखील कमी भावात द्राक्ष विकत घेत आहेत. निश्चितच याचा फटका देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सुगीचे येणारे दिवस संपत चालले असल्याचे या तरुण शेतकऱ्यांने सांगितले आहे. काही वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न तरुण शेतकरी करत असताना त्याला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचे दु:ख असल्याचे शेतकरी म्हणतोय. मात्र यातून राज्य सराकारने योग्य मार्ग काढला पाहिजे, अशी आशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

Tags:    

Similar News