महापुरानंतरचे भीषण वास्तव, शेतकऱ्याच्या तरुण मुलाची आत्महत्या

Update: 2021-08-05 11:45 GMT

राज्यात गेल्या महिन्यात सांगली, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात आलेला भीषण ओसरला आबहे, पण आता या महापुरानंतरचे वास्तव समोर येऊ लागले आहे. महापुराने पुन्हा एकदा शेती उध्वस्त केल्याने निराश झालेल्या एका २२ वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. 



 


सांगली जिल्ह्यातील नागाठणे येथील निलेश बाळकृष्ण पवार (वय 22) या तरुणाने आत्महत्या केली आहे. आपल्या जनावरांच्या गोठ्यातच त्याने गळपास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी 9 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. महापुराने निलेशच्या शेतामधील ऊसाचे मोठे नुकसान झाले. त्याने नैराश्यातून ही आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे.



 

बुधवारी सकाळी ८ वाजता निलेश पवार हा आपल्या सायकलवरून कुणाशी काही न बोलता गावातील गणेशनगर येथील आपल्या गोठ्याच्या साफसफाईसाठी गेला होता. त्याच्या गोठ्यातील जनावरंही पुरामुळे गेली होती, तसेच गोठाही उध्वस्त झाला होचा. पुरामुळे झालेली दूरवस्था पाहून तो निराश झाला होता. याच गोठ्यात दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ तो परत आली नी म्हणून त्याच्या भावाने गोठ्यात जाऊन पाहिले तर त्याने आत्महत्या केल्याचे दिसले. निलेश याच्या घरात १२ ते १३ जण सदस्य आहेत. पण निलेश एकटा कमावता होता, असे त्याच्या काकूने सांगितले आहे.



 

महापुरानं हजारो हेक्टर शेती उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा उल्लेख नाही. त्यात आता पूरग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सरकारने आता आणखी आत्महत्यांची वाट न पाहता तात्काळ मदत जाहीर कऱण्याची मागणी होऊ लागली आहे.

Tags:    

Similar News