रतन टाटांनी घेतली कोरोनाची लस, लस घेतल्यानंतर म्हणाले

Update: 2021-03-13 11:50 GMT

जगभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आणि दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील तसंच ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा 45 वर्षावरील लोकांना लस दिली जात आहे.

या दुसऱ्या टप्प्यात देशातील अनेक उद्योगपतींसह राजकारण्यांनी लस घेतली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतली. आता या यादीमध्ये आणखी एका व्यक्तीची वाढ झाली आहे. ती व्यक्ती म्हणजे रतन टाटा. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाट संस चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी शनिवार 13 मार्चला लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ते या ट्विट मध्ये म्हणतात...

मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यासाठी मी आभारी आहे. हे खूप सोप्प होतं. आणि मला त्रासही झाला नाही. मला विश्वास आहे की सर्व लोक लवकरच लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करतील.

Tags:    

Similar News