महाविकास आघाडी सरकारने हा महामूर्खपणा बंद करावा.

MPSC ची विद्यार्थी का आक्रमक झाले? MPSC च्या विद्यार्थ्यांची आक्रमकता ठाकरे सरकारला इशारा आहे का? वाचा लेखक श्रीरंजन आवटे यांचं मत

Update: 2021-03-12 03:53 GMT

MPSC परीक्षा पुन्हा एकदा रद्द करण्याचा निर्णय हा केवळ मूर्खपणाचाच नव्हे तर असंवेदनशीलतेचा आहे. माझे अनेक विद्यार्थी, काही मित्र या निर्णयाने हताश झाले आहेत. रोजगाराची कोणतीच संधी नाही. अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली आहे. सर्वत्र निराशेची महासाथ असताना एक परीक्षा धड पार पाडता येत नसेल तर या सरकारची सामान्यांच्या प्रश्नांपासून किती नाळ तुटली आहे, हे स्पष्ट होतं.

आधीच या परीक्षेच्या भीषण व्यवस्थापनाने कित्येकांच्या आयुष्याची अक्षरशः वाट लावली आहे. या सरकारने तरी यात सकारात्मक बदल करावा, अशी अपेक्षा होती. आजच्या घडीला तरी ही अपेक्षा फोल ठरली आहे.

सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या लोकांनी जर लाखो विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला नाही तर त्यांच्या तख्ताला थेट आव्हान तर दिलं जाईलच पण आत्महत्यांपासून ते वाट्टेल ते हिंसक प्रकारही होऊ शकतात. इट्स हाय टाइम. सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. Enough is enough!!!

श्रीरंजन आवटे

Tags:    

Similar News