GST परतावा आणि देवेंद्र फडणवीस यांचा बुद्धीभेद...

देशातील अनेक राज्य जीएसटी चा परतावा मिळत नाही. असा आरडा ओरडा करत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबूक वर लाईव्ह येत नवीन दावा केला आहे. या दाव्यांची आनंद शितोळे यांनी केलेली पोलखोल | #MaxMaharashtra

Update: 2020-10-21 08:04 GMT

आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेसबूक लाइव्ह वर येऊन जीएसटी बद्दल बहुमुल्य विचार मांडत होते. काही देशद्रोही लोक त्याला बुद्धिभेद म्हणत असतील. मात्र. देवेंद्र फडणवीस लाईव्ह करत असताना लक्षात न आलेली काही तथ्य सांगणं आवश्यक आहे.

जीएसटी तीन प्रकारचा असतो…

राज्यात व्यवहार झाला तर एसजीएसटी आणि सीजीएसटी, दोन्ही निम्मे निम्मे. म्हणजे, टक्केवारी ५+५=१०

दोन राज्यात असलेल्या लोकांत व्यवहार झाला तर आयजीएसटी, एकच कर. टक्केवारी १०

केंद्रशासित प्रदेशात व्यवहार झाला तर युजीएसटी, एकच कर, टक्केवारी १०. (१० टक्के उदाहरण म्हणून दिलेला आहे ).

हा सगळा कर जीएसटी च्या पोर्टलवर चलन तयार करून भरायचा असतो. तिथे निम्म्या वाटण्या फक्त चलनात असतात, प्रत्यक्षात पैसे बँकेच्या एकाच खात्यात वळते होतात.

राज्याच्या जीएसटी पोर्टलवर पूर्वी विक्रीकर विभागाच्या पोर्टलवर भरले जाणारे कर जे आजही अस्तित्वात आहे. ज्यामध्ये व्यवसायकर प्रामुख्याने आहे. असेच कर भरले जातात. ज्याचा जीएसटी मध्ये समावेश नाहीये.

फडणवीस अभ्यासू आहेत. असं म्हणतात. महाजीएसटी पोर्टल राज्याचे आहे. मात्र, जीएसटी भरायला लोकांना केंद्राच्या पोर्टलवर जाउनच पैसे भरावे लागतात. फडणवीस म्हणतात, राज्यांचा वाटा त्यांना पैसे भरतानाच मिळतो.

फडणवीस खरं बोलत असतील तर वेगवेगळ्या राज्यांचे प्रमुख आणि अर्थमंत्री राज्यांचा वाटा मिळाला नाही हे विधान करतात म्हणजे खोट बोलतात, हे खोट आहे हे ना कधी जीएसटी परिषदेने सांगितलं ना अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

राज्य खोट बोलत असतील तर आदरणीय मोदिजींना सांगून फडणवीस त्यांच्यावर खटले का भरत नाहीत? केंद्राची बदनामी केली म्हणून? फडणवीस फेसबुकवर येऊन जे काही बोललेत त्याला शुद्ध बुद्धिभेद म्हणतात.

#जीएसटी

Similar News