चीनचे राष्ट्राध्यक्ष झिनपिंग झी भारतासाठी एवढा वेळ का देत आहेत?

Update: 2019-10-28 07:06 GMT

चीनचे राष्ट्राध्यक्ष झिनपिंग झी भारतासाठी एवढा वेळ का देत असतात? आणि मम्मालापूरमच का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चिनी राष्ट्राध्यक्ष झी (Xi-Jinping) हे चेन्नई मधील मम्मालापूरम येथे दोन आठवड्यापूर्वी भेटले होते. आंतरराष्ट्रीय राजनीती मध्ये योगायोगाने किंवा सहज वाटले म्हणून काहीच होत नसते. अतिशय कॅज्युअल वाटणाऱ्या गोष्टींच्या मागे गहन अर्थ दडलेले असू शकतात.मम्मालापूरमच्या निवडी मागे देखील असाच गहन अर्थ आहे.

झी यांच्या नेतृत्वाखालील चीन देशासाठी पुढच्या ५० वर्षाचे प्लॅनिंग करीत आहे: आर्थिक, व्यापारी, लष्करी, तंत्रज्ञानिक आणि सॉफ्ट पॉवरचे देखील...

Courtesy : Social Media

चीन भारताला आपला राजकीय व आर्थिक स्पर्धक मानत नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया एकमेकांनां प्रतिस्पर्धी मानायचे तसे तर अजिबात नाही. भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी झी यांनी असे म्हटले होते की, “चीन आणि भारताने (India And China) परस्पर संबंधांचे पुढच्या १०० वर्षांची आखणी केली पाहिजे.”

“बेल्ट रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय)” या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला भारत भीक घालत नाहीय. बी आर आय प्रकल्पात समुद्रमार्गाचा देखील एक तुकडा अध्याहृत आहे. त्याला मेरीटाईम सिल्क रूट म्हटले जाते. त्या व्यापारी समुद्र मार्गावर आपले चेन्नई हे महत्वाचे बंदर असेल अशी चीनची योजना आहे. पुढच्या काही वर्षात भारताने बी आर आय प्रकल्पाला आणि समुद्र सिल्क रूटला राजी व्हावे हा चीनचा प्रयत्न असणार आहे.

Courtesy : Social Media

इथे मम्मालापुरमचे महत्व पुढे येते !

पल्लवा राजघराण्याची सत्ता दक्षिणेमध्ये तिसऱ्या ते नवव्या शतकापर्यंत होती. त्या काळात मम्मालापूरम हे प्रमुख बंदर होते. त्याच घराण्यातील एक राजा होता नरसिहनवर्मन (इस ६३० दरम्यान). त्याच्या कारकिर्दीत चेन्नई चे चीनशी व्यापारी आणि लष्करी सहकार्याचे संबंध वृद्धिंगत झाले.

त्यासाठी १५०० वर्षापूर्वीचे भारत चीन मधील व्यापारी संबंधांची आठवण चीन उजागर करू इच्छिते. मल्लम्मापुरम हे मोदी आणि झी यांच्या भेटीचे ठिकाण ठरवण्यामागील हे एक महत्वाचे कारण आहे

Similar News