पहिला सेट उद्धव ठाकरे यांनी जिंकला आहे नक्की ! - संजीव चांदोरकर

५६ वर्षांच्या शिवसेनेने अनेक दसरा मेळावे केले. पण यावर्षीचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन वेगवेगळ्या गटाचे दसरा मेळावे झाले. यात दोन्ही गटांची एकमेकांवर टीका देखील झाली. पण या लढाईचा पहिला सेट उद्धव ठाकरे यांनीच जिंकला आहे. कसा ते जाणून घेण्यासाठी  वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख....

Update: 2022-10-07 08:37 GMT

शिंदे गट अंगावर येऊन देखील उद्धव यांनी फक्त शिंदे गटाच्या शिंगात शिंग अडकवून त्यांनी सेट केलेल्या अजेंड्या पुरते मर्यादित राहायला नकार दिला.  आणि शिंदे गटाच्या अजेंड्याच्याच  नाहीत तर आकलनशक्तीच्या बाहेर असणारे अनेक मुद्दे उपस्थित केले : महागाई , बेरोजगारी, रुपया विनिमय दर , लोकशाही विरुद्ध हुकूमशाही इत्यादी 

उद्धव यांनी स्पर्श केलेल्या मुद्यांशिवाय त्यांचा आत्मविश्वास , त्यांची देहबोली आणि मोदी-शहा-फडणवीस याना डायरेक्ट अंगावर घेण्याची तयारी आश्वासक आहे. त्यांनी पुढचे सेट जिंकून पूर्ण मॅच जिंकणे महाराष्ट्रासाठी , मराठीसाठी , देशातील लोकशाहीसाठी आणि आम्ही म्हणू तेच हिंदुत्व वाल्या राजकीय शक्तींच्या नाकात वेसण घालण्यासाठी गरजेचे आहे 

एकखांबी भाजपला जेवढे काउंटर फोर्सेस तयार होतील तेव्हडे देशासाठी , अर्थव्यस्वस्थेसाठी , न जन्मलेल्या पिढ्यांसाठी आणि भाजप सामान्य कार्यकर्ते आणि दुसऱ्या / तिसऱ्या / चौथ्या फळीतील नेत्यांसाठी गरजेचे आहे 

उद्धव यांची लढाई शिंदे यांच्याशी नव्हती , नसणार आहे ; शिंदे तर एक प्यादं आहेत.  ती दीर्घकालीन चालू शकणारी लढाई मोदी-शहा प्रणित तगड्या राजकीय शक्तींशी आहे 

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला शुभेच्छा !

संजीव चांदोरकर (६ ऑक्टोबर २०२२)

Tags:    

Similar News