मोहनदास : उपक्षेचा वनवास

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महात्मा गांधी यांच्या जयंतीला आज आपण सारे त्यांचं स्मरण करत आहोत. पण गांधी ही केवळ स्मरण्याची गोष्ट नाही. तर त्यांच्या विचारांचं आचरण करून कृतीत आणणे म्हणजे खरे गांधी स्मरणे होय़ पण सध्या काय होतंय? जाणून घेण्यासाठी वाचा प्रमोद चुंचूवार यांची ही कविता...

Update: 2022-10-02 05:34 GMT

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महात्मा गांधी यांच्या जयंतीला आज आपण सारे त्यांचं स्मरण करत आहोत. पण गांधी ही केवळ स्मरण्याची गोष्ट नाही. तर त्यांच्या विचारांचं आचरण करून कृतीत आणणे म्हणजे खरे गांधी स्मरणे होय़ पण सध्या काय होतंय?


मोहनदास : उपक्षेचा वनवास

औद्योगीकरणाने म्हणे देशात

प्रगतीची लाट आली

अन् राजघाटची समाधी

टुरिस्ट स्पॉट झाली!

समाधीवरील जळत्या ज्योतीहून

सिगरेटची ज्योत महान आहे

गांधीवादी पुस्तकांपेक्षा म्हणे

मायापुरीत जास्त ज्ञान आहे

गांधींच्या समाधीसाठी म्हणे

जागा उगाच वाया गेली

फ्लॅट बांधता आले असते

हाताची उगाच माया गेली/

खादीनिर्मिती करून पोट भरता येतं

असे तुम्ही म्हणाले होते

कळलेय आम्हाला निर्मिती ऐवजी

ती घालूनच आज पोट भरता येते

गांधीजी तुमच्या स्वप्नाप्रमाणे

गरिबीला हा देश आपला वाटतो

इथला श्रीमंत मात्र,विदेशी

स्थायिक होण्यास उत्सुक असतो

तुमच्या शिकवणुकीची होळी करून

पुढारी वाटेल तसे रंग खेळतात

तुम्ही सविनय कायदेभंग केला

हे 'सवयीने' कायदेभंग करतात!

दारूबंदीचा आग्रह तू धरलास

हे उघडतात दुकाने दारूची

स्वदेशीचा मंत्र जपणारे

मद्यही घेतात विदेशी //

औदासिन्य अन् हिंसाचाराच्या

चक्रव्यूहात फसले जग आहे

गांधीरुपी अर्जुनाची

एकविसाव्या शतकाला गरज आहे

हुकुमशाहीचे समर्थक

गांधीचा अवमान करतात

गांधीचे मोठेपण नाकारणारे

गांधीवादी अण्णांसमोर नरमतात

गांधींच्या नावाचा पुरस्कार

मायावती बंद करीत आहे

गवळी गांधी टोपी घालतो

हा देश कुठे जात आहे?

- प्रमोद चुंचूवार

Tags:    

Similar News