एनडीटीव्ही , प्रणव आणि राधिका रॉय, विश्वप्रधान कमर्शियल्स , अदानी ग्रुप

अदानी गृपने एनडीटीव्हीवर कब्जा कसा केला? याबरोबरच एखाद्या कंपनीशी पंगा घेतला तर कोमत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याचं मार्गदर्शन करणारा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख

Update: 2022-08-28 05:14 GMT

अदानी ग्रुपने एनडीटीव्ही वर कब्जा करण्याच्या स्वच्छ इराद्याने काही गुंतवणुकी केल्या आहेत. एवढंच नाही तर अदानी एनडीटीव्ही वर का कब्जा करू इच्छितो? तो काही नफा कमवण्यासाठी नाही हे सर्वाना माहित आहे.

अदानी ग्रुप कंपनीला एनडीटिव्हीचे मेजॉरिटी शेअर्स मिळणार कि नाही? सेबी नक्की काय ऑर्डर देते? प्रकरण कोर्टात जाईल का? कोर्ट काय ऑर्डर देईल? हा त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञांचा विषय आहे. या लेखाचा विषय नाही.

लेखाचा विषय आहे प्रस्थपित व्यवस्थेशी पंगा घेणाऱ्या व्यक्ती / संस्था / कंपन्या यांनी कागदपत्रे , आपले वित्तीय व्यवहार , कर्जव्यवहार , आयकर , कायद्याचे पालन २४ तास डोळ्यात तेल घालून का केले पाहिजे?

या लेखाचा विषय आहे : प्रस्थापितांना आव्हान देणाऱ्यांना मित्रत्वाचे धोक्याचे इशारे देणे

नुसते सिरपे कफन बांधके मिशन चालवणे पुरेसे नाही. तुम्हाला माहित नसेल एवढी सविस्तर माहिती "ते" तुमच्या नकळत गोळा करत आहेत आणि ते हल्ला करण्याची संधी देखील फॅब्रिकेट करू शकतात एवढे ताकदवान आहेत.

मुद्दा आहे एनडीटीव्हीने स्वतःचे वित्तीय व्यवस्थापनात अनेक वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयातून तयार झालेल्या परिस्थितीचा. २००८ मध्ये एनडीटीव्ही ने इंडिया बुल्स कडून ५४० कोटींचे कर्ज घेतले. पुढे इंडियाबुल्स चे कर्ज फेडण्यासाठी काही काळाने आयसीआयसीआय कडून ३७५ कोटींचे कर्ज घेतले.

आयसीआयसीआय चे कर्ज फेडण्यासाठी विश्वप्रधान कमर्शियल कडून ३५० कोटींचे कर्ज घेतले.

विश्वप्रधान कडून कर्ज घेताना कर्ज करारात असे एक प्रावधान आहे (म्हणे) कि कर्ज न फेडल्यास कर्जाचे रुपातंर एनडीटीव्ही च्या शेअर्स मध्ये करण्याचे अधिकार विश्वप्रधान कंपनीस आहेत.

ही विश्वप्रधान कंपनी आधी अंबानींच्या मालकीची होती. मग ती महिंद्रा नाहाटा यांच्या मालकीची झाली आणि आता ती अदानी समूहातील कंपनीने विकत घेतली आहे

एनडीटीव्ही या मीडिया कंपनीला तबेल्यात इतर जनावरांच्या बरोबर बांधले जाऊ नये हि आपली आंतरिक इच्छा आहे. पण राजकारण , अर्थकारण , कायदा , सेबी सारखी नियामक मंडळे आपली किंवा मेजॉरिटीची आंतरिक इच्छा (आणि आपण एनडीटिव्हीचे मित्र अत्यल्प अल्पसंख्य आहोत ) काय आहे? यावर चालत नाहीत.

उघड दिसत आहे एनडीटीव्हीला कॉर्नर करण्यासाठी जुने रेकॉर्ड , कायद्यांचे अभ्यास , होमवर्क केले असेल. हा फक्त खोके आणि पेट्याचा विषय नाही

त्यामुळे यातून मोठा धडा कोणता असेल तर तो खुनशी लोकांशी पंगा घ्यायचा असेल तर वर्तमानातंच नाही , भविष्यातच नाही तर भूतकाळात देखील तुम्ही काळजी घेतलेली असली पाहिजे. कारण ते तुमचा माग काढत काढत तुमच्या मागून येत असतात आणि खिंडीत पकडतात.

एनडीटीव्ही , रवीश कुमार , प्रणव रॊय आणि सगळी टीम कोणताही दडपण न बाळगता काम करत राहणे हि भारतीय लोकशाही टिकण्यासाठी काळाची गरज आहे.

Tags:    

Similar News