ध्वज फडकवण्याची योग्य पद्धत काय आहे?

Update: 2022-01-25 10:30 GMT

आपला राष्ट्रध्वज आपण साधारणपणे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, 1 मे महाराष्ट्र दिनी तसंच अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतीवर दररोज राष्ट्रध्वज फडकवला जातो. मात्र, हा ध्वज फडकवण्याचे काही नियम आहेत. हे नियम तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळी आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो. तेव्हा तो योग्य जागेत असेल. आणि तो दर्शनी ठिकाणी असेल अशा पद्धतीने तो लावला जावा.

सार्वजनिक इमारतीवर ध्वज लावण्याची प्रथा असेल तेथे राष्ट्रध्वज रविवार व सुट्टया धरून सर्व दिवशी सर्व हवामानात सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवला जाईल. मात्र, यासाठी ध्वज नियमांमधील काही अपवाद आहेत. ते वगळता ध्वज याच नियमांनुसार फडकवला जाईल. काही इमारतींवर रात्रीसुद्धा ध्वज लावला जाईल. मात्र, असे अतिविशेष प्रसंगी करण्यात येईल.

ध्वजारोहण नेहमीच समारंभपूर्वक केले जाते. ध्वज फडकवताना वेगात फडकवला जातो. मात्र, उतरवताना तो धिम्या धीम्या गतीने उतरवला जातो. जेथे ध्वज खिडकी, सौध किंवा इमारतीच्या पुढे आडवा किंवा कोनात लावला जाईल. तेथे केशरी पट्टा ध्वजदंडाच्या दूरच्या कडेला/ टोकाला असेल.

ज्या वकत्याच्या व्यासपीठावर ध्वज लावला जाईल, तो वक्ता श्रोत्यांकडे तोंड करून उभा राहिल्यावर त्याच्या उजव्या बाजूस फडकवला जाईल किंवा वक्त्याच्या मागे व वर आडवा स्वतंत्रपणे लावला जाईल.

ज्यावेळी मोटाककारवर एकच ध्वज लावला जाईल. त्यावेळी तो कारच्या झाकणावर (बॉनेटवर) पुढे मध्यभागी किंवा कारच्यापुढे उजव्या बाजूस लावला जाईल.

ज्यावेळी ध्वज मिरवणुकीत किंवा संचलनाला नेला जाईल. त्यावेळी तो संचलनाच्या उजव्या बाजूला म्हणजेच ध्वजाच्या दृष्टीने उजव्या बाजूला किंवा इतर अनेक ध्वज असतील तर ओळीच्या पुढे मध्यावर असेल.

ध्वज लावण्याची चुकीची पद्धत कोणती?

खराब झालेला किंवा चुरगळलेला ध्वज लावला जाणार नाही.

कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला आदर करण्यासाठी ध्वज वाकवला जाणार नाही.

इतर कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा, तसेच ज्या ध्वजदंडावर राष्ट्रीय ध्वज लावला असेल त्यावर कोणतीही फुले, हार किंवा चिन्हे नसावीत.

केशरी बाजू खाली करून ध्वज जाणीवपूर्वक प्रदर्शित केला जाणार नाही.

ध्वज खराब होईल असा पद्धतीने लावू नये किंवा बांधू नये.

प्रियंका आव्हाड

awhad.priyanka11@gmail.com

Tags:    

Similar News