'परवडणारी घरे' ही घोषणा देणाऱ्या मृणाल ताई गोरे

Update: 2021-06-24 18:04 GMT

मृणाल ताई गोरे यांची आज जयंती. त्या निमित्ताने गोरगरिबांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या मृणाल ताई गोरे यांच्याबाबत बॅंकींग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा

समाजवादी नेत्या मृणाल ताई गेारे यांची आज 24 June ला जयंती. नागरी निवारा परिषद ही त्याच्या महान कार्याची ओळख. 'परवडणारी घरे' हा शब्द प्रयोग पी बी सामंत व मृणाल ताई यांचाच! या परवडणाऱ्या घराकरीता इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत नागरी कमाल ज़मीन धारणा क़ायदा आणला. गिरणी मालक व जमीन मालकांनी याला कडाडून विरेाध केला. तो रद्द करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

पी बी सामंत व मृणाल ताईनी रस्त्यावरील आंदेालन करून, प्रदीर्घ उपेाषण करून दिंढेाशी येथील जमीन घर बांधणी करीता नागरी निवारा परिषदेसाठी मिळविली. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी सरकारी दराने ही ज़मीन विकत दिली. ULC कायद्यांमध्ये ही तरतूद आहे. १९९९ पर्यंत खूप कष्टाने 6300 Flat असलेल्या नागरी निवारा परिषदेच्या इमारती निर्माण झाल्या .

त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकार हा कायदा रद्द करून राज्य सरकारांनी देखील हा कायदा रद्द करावा हे बंधनकारक केले. या विरूध्द नागरी निवारा अभियान या संघटने मार्फत सुमारे 2 लाख सभासद नेांदवून मृणाल ताई गेारे यांच्या नेतृत्वाखाली मेाठा संघर्ष झाला. तो कायदा 2007 मध्ये रद्द झाला. मात्र, आज मूळ कायद्यातील गांभीर्य अगदी प्रभावी पणे दिसून आलं आहे.

2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने धर्मांधिकारी यांच्या खंडपीठाने सरकारने उद्योगपतींना कारखाने उभारण्याकरिता किती जमिनी दिल्या व बंद पडलेल्याकारखान्या च्या किती जमिनी पुन्हा तांब्यात घेऊन जनते करीता परवडणारी घरे बांधली याचा जाब विचारला. यामुळे ही चळवळ अजूनही जिवंत आहे.

आता संघर्षाला अजून धार आली आहे. कारण भाजप सरकारने बेकायदेशीर या ज़मीनी भांडवलदार कंपनी मालकांना गजाआड करण्याऐवजी त्यांनाच चणे फुटाण्याच्या भावाने जमीन विकण्यास सुरूवात केली आहे. आता महाविकास आघाडी सरकारने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करत असताना असाच बेकायदेशीरपणे बिल्डर धार्जिणा निर्णय घेतला आहे. 'अर्थात कानून के हात लंबे है' हे आता अनेक न्यायालयांनी सिध्द केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील कोट्यांवधी गरीब व मध्यमवर्गीय कुटूंब परवडणाऱ्या किंमतीत घरांच्या प्रतिक्षेत आहेत. अजूनही एक मेाठी चळवळ आकार घेत आहे! ती मृणाल ताई गेारे या कर्तृत्वाने जिवंत आहेत.

विश्वास उटगी

Tags:    

Similar News