सायनचं शासकीय रुग्णालय व्हेंटीलेटरवर!

Update: 2019-12-03 16:00 GMT

शासकीय रुग्णालयात रुग्णांप्रति निष्काळजीपणाचे अनेक प्रकरणं आपण ऐकलेले आहेत. मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक शासकीय रुग्णालयात १० दिवसात दुसऱ्यांदा डायलिसीस युनिट बंद करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली.

रविवारी पाण्याची टाकी फुटून सर्व पाणी डायलिसीस कक्षात आलं. त्यामुळे यनिट २ दिवस बंद करावं लागलं. आता युनिट पूर्ववत करण्यात आलं असलं तरी दोन दिवस बंद असल्या कारणाने डायलिसिससाठी गेलेल्या रूग्णांना माघारी फिरावं लागलं आणि खासगी रुग्णालयात जास्त पैसे देऊन डायलिसिस करून घ्यावं लागलं.

हे ही वाचा...

मोदी काका गेले आणि नानाभाऊ आले, काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य?

इंदोरच्या समस्या मांडण्यासाठी सुमित्रा महाजनांना काँग्रेसचा आधार !!!

सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून हवी : जयश्री जगदाळे

२२ नोव्हेंबरलाही पिण्याच्या पाण्याची टाकी (आरओ युनिट) फुटून नेफ्रोलॉजी विभागात पाणी साचलं होतं. एक महिन्याच्या कालावधीत डायलिसिस युनिट बंद होण्याची ही चौथी वेळ होती. रविवारपासून बंद झालेलं डायलसिस युनिट आज चालू करण्यात आलं. मात्र, २ दिवस युनिट बंद असल्यामुळे रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागले.

डायलिसिस युनिट बंद असल्यामुळे त्यासाठी आलेले रुग्ण माघारी फिरत दुसरं रुग्णालय गाठलं. या युनिटमध्ये डॉक्टर दररोज २८ रूग्णांचे डायलिसिस करतात. या रुग्णालयात दर महिन्याला सुमारे ४०० रुग्णांचे डायलिसि केलं जातं.

राज्यभरातून लोक सायन रुग्णालयात उपचारासाठी येतात. पंरतु शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांना रिकाम्या हाताने फिरावं लागतंय. रुग्णालयातही मोठी अस्वच्छता आहे. या दुर्गधीमुळे एखादी चागंली व्यक्ती देखील याठिकाणी जाऊन आजारी पडेल अशी परिस्थिती या रुग्णालयात आहे.

त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेली ही आरोग्य व्यवस्था डायलिसिस करण्याआधीच मृतप्राय झालेली असेल.

Similar News