Fact Check: मृत्यूच्या दाखल्यावर मोदींचा फोटो?

मोदींनी खरंच मृत्यू प्रमाणपत्रावर स्वत:चा फोटो लावला आहे का? लोक सोशल मीडियावर का संतप्त झाले आहेत. वाचा सत्य काय आहे?

Update: 2021-04-23 19:16 GMT

गेल्या काही दिवसांपासून मोदींचा फोटो असलेला एक कागद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना लोक मोदींचा फोटो मृत्युच्या दाखल्यावर देखील असल्याचं सांगत आहेत. जो फोटो व्हायरल झाला आहे. त्या कागदाच्या खालच्या बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे.

या कागदावरील मजकूर अस्पष्ट दिसत असून बहुतेक शब्द वाचणे जवळपास कठीण आहे. अनेक लोक या कागदपत्राचा फोटो पोस्ट करत असून पंतप्रधान लोकांच्या मृत्यू दाखल्यावर सुद्धा स्वतःचा फोटो छापत आहेत. असा दावा करत आहेत.

याबद्दलचीच एक पोस्ट इंडियन रेसिस्ट या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेली पाहायला मिळते.

त्याचबरोबर अनेक लोक ट्वीटरवर हा फोटो शेअर करत आहेत.

फेसबुक वरही अनेक लोक हा फोटो मृत्यू प्रमाणपत्र समजून शेअर करत आहेत.

Full View

मोदींचा हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असून फोटो शेअर करताना लोक मोदींवर टीका देखील करत आहेत.

काय आहे सत्य?

रिवर्स इमेज ने जेव्हा आपण हा फोटो सर्च करतो. तेव्हा हा फोटो इंडिया टाइम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इंडिया टाईम्स ने 17 एप्रिल 2021 ला प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये त्यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर वृत्त प्रसारीत केलं आहे.

यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तसंच मंत्री नवाब मलिक यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना

लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर ज्यापद्धतीने नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोदी यांचा फोटो मृत्यूच्या दाखवल्यावर देखील लावण्यात यावा. नवाब मलिक यांचं हे विधान १७ एप्रिल 2021 चं आहे. असं इंडिया टाइम्सच्या रिपोर्ट मधून समोर येतं.

इंडिया टाइम्सच्या बातमीमध्ये फोटोच्या बारकोडबाजूला लिहिलेल्या मजकुरात "कोविड 19 लसीकरणासाठी तात्पुरते प्रमाणपत्र." असा उल्लेख केला आहे.

अमर उजाला च्या बातमीमध्ये देखील हा फोटो दाखवण्यात आला आहे.



 या अगोदर देशातील काही राज्यांतील विधानसभा निवडणूकीच्या वेळी देखील विरोधकांनी कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावण्यानंतर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच ते आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. वारंवार मृतांचा नवीन आकडा समोर येत असतांना अनेक राजकारणी सुद्धा ऑक्सिजन सिलेंडरवर स्वतःच्या फोटोचा बॅनर लावून फोटो काढण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे वॅक्सीन घेतल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असला तरी लोक ते प्रमाणपत्र मृत्यूचा दाखला म्हणून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळं भाजपच्या लोकांची चांगलीच गोची झाली आहे.

Alt news ने याबाबात वृत्त दिलं आहे. https://www.altnews.in/hindi/no-this-image-of-a-document-with-photo-of-pm-modi-in-not-a-death-certificate/

Tags:    

Similar News