Fact Check : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत सैन्याच्या ब्रिगेडवर आत्मघाती हल्ल्याची बातमी खोटी

Update: 2025-05-10 13:29 GMT

काश्मीरच्या पहलगाममध्ये २६ पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत त्यांचा जीव घेतला. या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून घ्यायला सुरुवात केलीय. आतापर्यंत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं उध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय. माध्यमांवर या घटनेशी संबंधित बातम्या प्राधान्यानं दाखवल्या जात आहेत. यामध्ये कित्येक माध्यमांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी इथं भारतीय सैन्याच्या एका ब्रिगेडवर आत्मघाती हल्ला झाल्याचं वृत्त प्रसारित केलं.

इंडिया टुडे या आघाडीच्या भारतीय वृत्तसमूहाच्या आज तक या हिंदी वृत्तवाहिनीवर अँकर श्वेता सिंह आणि अंजना ओम कश्यप यांनी भारतीय सैन्याच्या १२० ब्रिगेडवर जम्मू-काश्मीरच्या राजौरी इथं आत्मघाती हल्ला झाल्याचा दावा बातमीतून केला.

Delete Edit

एबीपी न्यूज या आणखी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या अँकर चित्रा त्रिपाठी यांनीही जम्मू-काश्मीरच्या राजौरी इथं भारतीय सैन्याच्या १२० ब्रिगेडवर आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा एका बातमीद्वारे केला.

Delete Edit


फर्स्ट इंडिया न्यूज आणि विस्तार न्यूज ने देखील राजौरी इथं १२० ब्रिगेडवर आत्मघाती हल्ल्याचा दावा करणारी बातमी प्रसारित केली होती.

फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूजनं आत्मघाती हल्ल्यासंदर्भातील सत्यता तपासण्यासाठी इंटरनेटवर या बातमीसंदर्भातील काही की-वर्ड्स सर्च केले. यामध्ये न्यूज एजन्सी असलेल्या ANI ची एक बातमी दिसली. या बातमीमध्ये भारतीय सैन्याच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगण्यात आलं होतं की, पठाणकोट किंवा राजौरी मध्ये दहशतवाद्यांद्वारे आत्मघाती हल्ल्याशी संबंधित बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत.


आणखी एक न्यूज एजन्सी PTI चं देखील एक ट्विट ऑल्ट न्यूजच्या हाती लागलं. त्यात केंद्र सरकारनंही राजौरी मध्ये सैन्याच्या ब्रिगेडवर आत्मघाती हल्ल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.

एकूणच, काही भारतीय माध्यमांनी भारतीय सैन्याच्या एका ब्रिगेडवर आत्मघाती हल्ल्याची खोटी बातमी प्रसारित केली, हे सत्य आहे.

https://www.altnews.in/hindi/govt-dismisses-claims-of-suicide-attack-on-army-brigade-in-rajouri-by-aaj-tak-abp-news/

Tags:    

Similar News