नितिन गडकरी यांची कमाल: यमुना एक्सप्रेस वे चा फोटो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे चा सांगत ट्वीट

Update: 2021-07-24 14:45 GMT


दिल्ली-मुंबई एक्सप्रेसचा विकास असं म्हणत एका महामार्गाचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या फोटोचं कॅप्शन "इंटरचेंज नियर अंकलेश्वर" असं लिहिण्यात आलं आहे. फोटोमध्ये महामार्गाचा जुना फोटो आणि नवीन फोटो असे दोनही फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेते प्रवीण अलाई यांनी हा फोटो रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत ट्विट केला आहे. सोबतच @PMOIndia, @BJP4India, @BJP4Maharashtra यांना सुद्धा त्यांनी टॅग केलं आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांनी #PragatiKaHighway या हॅशटॅगचा वापर केला आहे.

दरम्यान नितीन गडकरी यांनी सुद्धा नर्मदा नदीवरील पुलाच्या बांधकामाचा कथित विकास दर्शविण्यासाठी आणखी दोन फोटो ट्वीट केले होते. मात्र काही काळानंतर त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं.




 हिंदी न्यूज चॅनल 'इंडिया टीव्ही' ने दिल्ली-मुंबई एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये सुद्धा याच फोटोचा वापर केला होता.



काय आहे सत्य?

पहिल्या फोटोचं रिव्हर्स इमेज सर्च केलं असता अनेक वेबसाईट्सवर हा फोटो यमुना एक्सप्रेसवे इंटरचेंजचा असल्याचं दिसून आलं. दरम्यान इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये हा फोटो दिसून आला. फोटोच्या खाली "यमुना एक्सप्रेस वे, ग्रेटर नोएडा ते आग्रा" असं लिहिलं होतं. रिपोर्टमध्ये या फोटोचं श्रेय जेपी ग्रुपला देण्यात आलं होतं. म्हणून आम्ही जेपीच्या वेबसाइटवर गेलो. "एक्सप्रेस वे" या कॅटेगरीत त्याच्या गॅलरीत हा फोटो पाहायला मिळाला.


 "एक्सप्रेस वे" या कॅटेगरीत त्याच्या गॅलरीत हा फोटो पाहायला मिळाला.




 दरम्यान हा फोटो यमुना एक्सप्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरण (YEIDA) च्या वेबसाइटवर बॅनर पिक्चर म्हणून वापरला गेला आहे. तर या फोटोवर "Yamuna Express Way… Future is Here" असं सुद्धा लिहिण्यात आलं आहे.



 ३ डी गूगल मॅप द्वारे शोध घेतला असता, अंकलेश्वर आणि यमुना एक्सप्रेसवे इंटरचेंजमधील 'इंटरचेंज' बराच वेगळा आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा दिल्ली, हरियाणा, राजस्थान, एमपी, गुजरात आणि महाराष्ट्र मार्गे जाणार आहे. तर यमुना एक्स्प्रेसवे हा ग्रेटर नोएडावरुन आग्राला जोडणारा वेगळा प्रकल्प आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शेअर केला जाणारा महामार्गाचा फोटो अंकलेश्वरमधील इंटरचेंजचा नाही.



 दुसऱ्या फोटोचा शोध घेण्यासाठी आम्ही पुन्हा रिव्हर्स इमेज सर्च टूलचा वापर केला. दरम्यान हा फोटो प्लॅनेट गुजरातच्या वेबसाइटवर आढळला. तसेच हा नर्मदावर बांधलेल्या सरदार पुलाचा खरा फोटो नसून डिजिटल फोटो आहे. हा फोटो २०१६ च्या सुरुवातीला "StrucCore" नावाच्या वेबसाईटवर सुद्धा शेअर करण्यात आला होता.



 बारुच येथील नर्मदावरील या पुलाचं उदघाटन २०१७ मध्ये करण्यात आलं होतं. खाली आपण पुलाचा फोटो पाहू शकतो.





अशाप्रकारे, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील विकास दर्शविण्यासाठी यमुना एक्सप्रेस वे चा फोटो शेअर करण्यात आला. एवढंच नव्हे तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी देखील चुकीचा फोटो शेअर करत ट्वीट केलं.



 


Tags:    

Similar News