Fact Check: लखनौ तांगेवाल्यांनी खरंच पाकिस्तान झेंडा आपल्या तांग्यावर रंगवलाय का?

Update: 2021-08-28 12:22 GMT

न्यूजरूम पोस्टने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, त्या व्हिडिओमध्ये, 20 वर्षांपासून टांगा चालवणाऱ्या नूर आलम आणि वसीर यांनी त्यांच्या टांग्यावर पाकिस्तानचा झेंडा रंगवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या व्यक्तींना 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणण्यात अडचण आहे. पण 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणण्यात लाज नाही. असा दावा देखील या व्हिडीओमध्ये करण्यात येत आहे.

मुस्लिम समाजातील दोन गरीब टांगा चालकांना व्हिडीओत दिसणारा व्यक्ती बळजबरीने 'हिंदुस्तान जिंदाबाद', 'भारत माता की जय' आणि 'पाकिस्तान मुर्दाबाद' च्या घोषणा देण्यास भाग पाडत आहे.

या लोकांनी घोषणा दिल्यानंतरही तो त्यांना घोषणा देण्यास वारंवार सांगत आहे.. दरम्यान कारण नसताना केलेल्या कव्हरेजमुळे नाराज झालेल्या वसीरने त्या माणसाला विचारले की, त्याने ही घोषणाबाजी का करायला पाहिजे? असं म्हणत पाकिस्तान आणि भारत दोन्ही जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे.

दैनिक जागरने देखील एक रिपोर्ट केला आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानचा झेंडा टांग्यावर रंगवण्यात आला आहे. यासह हेडिंगमध्ये असेही लिहिले होते की, लखनौमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या.




 


हा व्हिडीओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.




 


हा व्हिडिओ सर्वात अगोदर 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ 24 ऑगस्ट ला सकाळी 9.25 वाजता शेअर केल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, भाजप समर्थक वेबसाइट क्रिएटलीने, यूपी आणि लखनौ पोलिसांना टॅग करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

न्यूजरूम पोस्टने या व्हिडीओ संदर्भात एक आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध केलं आहे. या आर्टिकल मध्ये दावा करण्यात आला आहे की, "खांद्यावरती पाकिस्तानचा झेंडा पाहून लोकांनी टांगा चालकाला थांबवले."

यासोबतच या आर्टिकल मध्ये असा दावा ही करण्यात आला आहे की, पोलिसांना असं आढळून आलं की, टांग्यावर 'कर्बला प्रतिक' रंगवण्यात आलं होतं. ते चिन्ह पाकिस्तानचा ध्वज नव्हतं. पोलिसांनी दोन्ही बाजू समजून घेतल्या. या चौकशीत हा पाकिस्तानचा ध्वज नसून एक इस्लामिक प्रतीक असल्याचं समोर आलं. यादरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या पक्षांची चौकशी केली. यामध्ये टांगा चालक आणि टांग्यावर पाकिस्तानचा ध्वज रंगवण्याचा आरोप करणारे काही लोक होते.

"तांगा चंद्र आणि ताऱ्यांनी रंगवलेला होता. त्यावर पाकिस्तानचा ध्वज बनवण्यात आला नव्हता. मात्र, या सगळ्या वादानंतर टांगा चालकाने ती जागा काळी रंगवली. तसेच या प्रकरणी कोणतीही तक्रार अद्याप पर्यंत नोंदवण्यात आलेली नाही."

आणि या सोबतच चालकाला त्रास देणाऱ्यांवर सुद्धा आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, टांगा वाल्याने कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.

न्यूजरूम पोस्टने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना हा महत्त्वाचा तपशील काढून टाकला होता.

मात्र, टांग्यावर केलेले पेंट व्यवस्थित पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, तो पाकिस्तानचा ध्वज नाही. पाकिस्तानच्या ध्वजात अर्धा चंद्र आणि 45 अंशांच्या कोनात एक तारा असतो. तसेच डाव्या बाजूला एक पांढरी पट्टी असते. यात लक्षणीय बाब म्हणजे, अर्धा चंद्र आणि तारा इस्लामिक चिन्हे आहेत.



 


त्यामुळे दोन टांगा चालकांचा स्थानिक लोकांनी पाठलाग केला. तसेच काही माध्यम, पत्रकार आणि प्रचार वेबसाइट्सने चुकीची माहिती पसरवली असल्याचं समोर आलं आहे. खाली दैनिक जागरणचे संपादक पवन तिवारी यांच एक ट्विट आहे.

दरम्यान, पवन तिवारी यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात टांगा चालकांना भारतीय ध्वज आणि 'हिंदुस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यास भाग पाडण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होते. तसेच त्यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये गंमतीने लिहिले आहे की, हे चालक पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर 'राष्ट्रवादी' बनले.

यासोबतच, आज तकच डिजिटल चॅनेल एक ट्वीट करत 'यूपी तक' ने टांग्यावर पाकिस्तानचा झेंडा असं लिहिलं मात्र, नंतर ते ट्विट डिलीट केलं आणि एक नवीन ट्विट केलं ज्यात असं लिहिण्यात आलं होतं की,

"तो माणूस पाकिस्तानसारखे झेंडे रंगवून गेली 20 वर्षे टांगा चालवत होता''.

निष्कर्श:

या अगोदरही असे अनेक फॅक्ट चेक करण्यात आले आहेत. ज्यामध्ये इस्लामिक प्रतिकांना पाकिस्तानचा ध्वज म्हणून सांगण्यात आले आहे.

या संदर्भात Alt news ने ट्वीट केलं आहे.

https://www.altnews.in/muslim-tanga-drivers-in-up-hounded-after-false-claim-of-painting-pakistan-flag-on-tanga/

Tags:    

Similar News