Fact Check मुस्लीम व्यत्तीने 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केले, काय आहे व्हायरल दाव्याचं सत्य?

Update: 2021-10-20 06:48 GMT

एका वडिलांचा आणि मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये, त्या व्यक्तीने मुस्लिम धर्माशी संबंधित टोपी घातली आहे. तर मुलीने बुरखा घातला आहे. दोघांच्या गळ्यात हार घातलेले दिसतात. दरम्यान, हा फोटो शेअर करत असा दावा केला जात आहे की, या व्यक्तीने 9 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आहे. त्याचबरोबर असंही म्हंटल जात आहे की, जे 9 वर्षांच्या मुलीला पत्नी मानतात आणि जे 9 वर्षांच्या मुलीला देवी मानतात ते कधीही भाऊ होऊ शकत नाहीत.

व्हेरिफाइड ट्विटर हँडल '@rakesh_bstpyp' ने हाच दावा करत फोटो ट्विट केला आहे. दरम्यान, या ट्विटर हँडलने स्वतःला वृत्तपत्राचे संपादक असल्याचं म्हटलं आहे.. त्यांच्या या ट्विटला डिलीट करण्यापूर्वी साधारण १३०० पेक्षाही जास्त वेळा रिट्विट करण्यात आलं आहे.


दरम्यान, ट्विटर युजर ललिता ठाकूरने ही याच दाव्यासह फोटो ट्विट केला आहे. मात्र, त्यांच्या ट्विटर बायोमध्ये ललिता यांनी स्वत: ला पंतप्रधान मोदींचा समर्थक म्हणून वर्णन केले आहे.



ट्विटर सोबतच फेसबूक वरही हा फोटो व्हायरल झाला आहे.


मात्र, हा फोटो 2017 मध्ये पाकिस्तानातील एका मौलवीने आपल्याच मुलीशी लग्न केल्याच्या दाव्यासह शेअर होत असल्याचं आढळून आलं.

काय आहे सत्य...

दरम्यान, रिव्हर्स सर्च इमेजमध्ये सर्च केले असता, हा फोटो 23 सप्टेंबर 2018 च्या फेसबुक पोस्टमध्ये सापडला. पोस्टनुसार, एक वडील आणि मुलीने एकत्र कुराण पठण पूर्ण केले होते. त्याचबरोबर 2016 मध्ये अनेक लोकांनी हा फोटो शेअर केला होता.

फेसबुक पेज 'Tajweed ul Quran' ने हा फोटो 3 फेब्रुवारी 2016 ला पोस्ट केला होता.

इस्लामिक बोर्ड नावाच्या वेबसाइटने देखील 2 ऑक्टोबर 2016 ला हा फोटो शेअर केला होता. या वेबसाईटवरील मजकूरानुसार वडील आणि मुलीने हाफिज-ए-कुराण एकत्र पूर्ण केले. याशिवाय, भारतातील मुस्लिम समाजाच्या मुलांनी कुराणचे पठण पूर्ण केल्याबद्दल देखील अशाच प्रकारे अभिनंदन केले जाते. अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्यात मुलांनी कुराण पठण पूर्ण केले आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात 8 वर्षांच्या तोबा झैनाबने देखील 20 महिन्यांत कुराणचे पठण पूर्ण केले होते.

ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबैर यांनी देखील 14 ऑक्टोबर रोजी या चित्राची सत्यता सांगत ट्विट केलेलं आहे.



निष्कर्ष:


एकूणच, एका मध्यमवयीन व्यक्तीने 9 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याचा खोटा दावा करत वडील आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सांप्रदायिक दृष्टीकोनातून फोटो शेअर करून हिंदू-मुस्लीम धर्मांमध्ये वैर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अगोदरही अशाच प्रकारे, आई-मुलाच्या जोडीचा फोटो अशाच खोट्या दाव्यासह शेअर करण्यात आला होता.

या संदर्भात alt News ने Fact Check केलं आहे.


Tags:    

Similar News