Fact Check : PM मोदींचे भाषण टेलिप्रॉम्प्टरमुळे बंद पडले होते का?

पंतप्रधान मोदी 17 जानेवारी रोजी विश्व आर्थिक मंचच्या ऑनलाईन दावोस अजेंडा 2022 शिखर संमेलनात बोलत होते. त्यावेळी त्यांनी अचानक भाषण थांबवले. त्यावरून पंतप्रधान मोदींना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते. तर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत होता. त्यासोबतच पंतप्रधान मोदी भाषण करत असताना अडखळल्याचा व्हिडीओ शेअर करत विरोधी पक्षांनी ट्रेंडही चालवला होता. तर टेलिप्रॉम्प्ट्रर खराब झाल्यामुळेच मोदींना भाषण थांबवावे लागल्याचा आरोप विरोधक करत होते. टेलिप्रॉम्प्टरशिवाय मोदी भाषण करू शकत नाही, असा टोला विरोधकांनी लगावला आहे.

Update: 2022-01-21 14:32 GMT

कॉंग्रेसच्या ऑफिशियल ट्विटरवरून #TelepromptorPM या हॅशटॅगसह लाईव्ह स्ट्रीममधील व्हिडीओ ट्वीट केला होता. त्याबरोबरच अनेक अधिकृत अकाऊंटवरूनही #TelepromptorPM हा ट्रेंड चालवत पंतप्रधानांवर टीका केली जात होती. तर काँग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद, पश्चिम बंगाल काँग्रेस, पश्चिम बंगाल महिला काँग्रेस, मणिपुर प्रदेश काँग्रेस सेवादल, तामिळनाडू प्रदेश काँग्रेस सेवादल यांनीही हा व्हिडीओ शेअर करत हाच दावा केला होता.

काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी दोन व्हिडीओ जोडून शेअर केले होते. त्यापैकी एक राहुल गांधी यांचा जुना व्हिडीओ ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात, असा आरोप केला जात आहे. तर दुसरा पंतप्रधान मोदींनी अडखळत भाषण थांबवल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ काँग्रेस नेते सलमान निजामी आणि रामकिशन ओझा, छत्तीसगड प्रदेश कांग्रेस सेवादल आणि पंजाब प्रदेश काँग्रेस सेवादल यांनीही शेअर केला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि जेष्ठ वकील प्रशांत भुषण यांनीही व्हिडीओ शेअर करताना हाच दावा केला आहे.

मोदींचे भाषण टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्यामुळे थांबल्याचा दावा करणाऱ्या अनेक हाय नेटवर्क फेसबुक पेज आणि ग्रुप्समध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये महुआ मोइत्रा फॅन्स (4 लाखांपेक्षाजास्त फॉलोवर्स), प्रियंका गांधी फॅन्स पेज (7 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स) , द लाई लामा ( दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स) वेल सनी ( 9 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स) यांचा सामावेश आहे.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/01/Screenshot-2022-01-18-at-14.24.24.jpg?w=1024&ssl=1

पडताळणी-

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गोंधळ का उडाला? हे समजून घेण्यासाठी त्यावेळच्या कार्यक्रमातील घटनांचा क्रम पाहणे गरजेचे आहे. तर त्यासाठी अल्ट न्यूजने WEF च्या शिखर संमेलनातील भाषण काही यु्ट्यूब वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर पाहिले. त्यात नरेंद्र मोदी, दूरदर्शन नॅशनल आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, डीडी आणि WEF या चॅनलवर वेगळा व्हिडीओ असल्याचे पहायला मिळाले. मात्र नरेंद्र मोदी या युट्यूब चॅनलवर पंतप्रधानांचा गोंधळ उडाल्याचे दिसत नाही.

दूरदर्शनच्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान आधीपासूनच सहा मिनिटे बोलत आहेत. त्यांचे हे भाषण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या युट्यूब चॅनलवर प्रसिध्द केले नाही. त्यात WEF च्या लाइव्ह स्ट्रीमच्या व्हर्जनमध्ये पहिले 8 मिनिट काहीही सुरू नाही. तर त्यानंतर लाईव्ह स्ट्रीम सुरू होते. तर त्यामध्ये पंतप्रधानांनी आधीपासूनच भाषण सुरू केले होते. ज्यामध्ये सहज समजून येत आहे की तांत्रिक कारणांमुळे पंतप्रधानांच्या भाषणाची सुरूवात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले नव्हते.

त्यानंतर पोर्टच्या पुढच्या भागात अल्ट न्यूजने डीडी आणि WEF व्हिडीओमधील वेळेनुसार घटना समजून घेतली. दुरदर्शनच्या सुरूवातीच्या 4 मिनिटात पंतप्रधान मोदी आणि पाहुणे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब एकमेकांशी संवाद साधत आहेत. 5 मिनिट 4 सेकंदाला पाहुण्यांच्या ओळखीशिवाय पंतप्रधान मोदींनी भाषण सुरू केले. ज्यामध्ये काही सेकंद आधी ( 5 मिनिट पासून 5 मिनिट 1 सेकंद) एक व्यक्ती इंग्रजीत ग्राफिक्स...सर? असे विचारतानाचा आवाज येत आहे. ज्यानंतर पंतप्रधान 5 मिनिट 12 सेकंदवर आपला ईअरपीस कानात घालतात आणि आपले भाषण सुरू करतात.

Full View

मात्र 7 मिनिट 7 सेकंदावर पंतप्रधान मोदी आपल्या उजव्या बाजूला पाहतात आणि बोलने थांबवतात. त्यानंतर जवळपास 7 मिनिट 15 सेकंदावर ते कार्यक्रमाच्या पाहुण्यांना त्यांच्या नावाने संबोधून आवाज येत असल्याचे विचारतात. "ठीक से सुना रहा है?" त्यानंतर श्वाब यांनी आवाज येत असल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ मोदी यांनी आपल्या इंटरप्रेटर ला आवाज येत आहे का? असे विचारले. श्वाब पंतप्रधानांना सांगतात की, हो आवाज पोहचत आहे. (7 मिनिट 45 सेकंद) त्यानंतर एका संगीताच्या आवाजानंतर थोडक्यात ओळख करून देऊन पुन्हा बोलण्यास सुरू करतात.

Full View

10 मिनिट 49 मोदी आपले भाषण पुन्हा सुरू करतात. त्यानंतर 5 मिनिट 4 सेकंदानंतरचे भाषण त्यांनी पुन्हा पहिल्यापासून सुरू केले. ही सुध्दा लक्षात घेण्यासारखी बाब आहे. याबरोबरच भाषण करताना टेलिप्रॉम्प्टरचा वापर करणे कोणती विशेष बाब नाही.

Full View

WEF च्या चॅनलवर हा व्हिडीओ पाहिला असता नेमकं त्याच वेळी पंतप्रधानांनी आपल्या उजव्या बाजूला पाहिले आहे. त्यावेळी इव्हेंट मॅनेजमेंटचा एक व्यक्ती स्पष्टपणे इव्हेंट मॅनेजमेंट टीममधून इव्हेंटचे मॅनेजमेंट करत होता. त्यावेळी त्याचा इंग्रजीतुन आवाज येतो की, पंतप्रधानांना विचारायला हवं की सगळे या कार्यक्रमात जोडले गेले आहेत का? त्यांनी मोदींना विचारले की, सर त्यांना विचारायचं का की सगळे जोडले गेले आहेत का? त्यानंतर पंतप्रधान विचारतात की, क्या उनके भाषण और इंटरप्रेटर की आवाज सुनाई जाती है. यावरून या टीमच्या हस्तक्षेपामुळे मोदींचे भाषण थांबल्याचे स्पष्ट होत आहे.

Full View

त्यानंतर काहीतरी तांत्रिक कारण असल्याचे समजून क्लॉस श्वाब यांनी पंतप्रधानांचा पुन्हा परिचय करून दिला आणि पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भाषण सुरू केले.

निष्कर्ष-

वरील सर्व मुद्द्यांवरून असे स्पष्ट होत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण टेलिप्रॉम्प्टरच्या बिघाडामुळे नाही तर इव्हेंट मॅनेजमेंटच्या तांत्रिक बिघाडामुळे थांबवावे लागले होते.

https://www.altnews.in/hindi/teleprompter-snafu-no-pms-speech-interrupted-because-of-a-technical-glitch/


Tags:    

Similar News