Fact Check : जी-20 परिषदेच्या भारत मंडपममध्ये पाणी साचल्याचा दावा खरा आहे का?

Update: 2023-09-11 07:46 GMT

Fact Check : जी-20 परिषदेच्या भारत मंडपममध्ये पाणी साचल्याचा दावा खरा आहे का?

भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेसाठी 4 हजार 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र दरम्यान जी-20 शिखर परिषद पार पडली. त्या भारत मंडपम येथे पाणी साचल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण नेमका हा व्हिडीओ खरा आहे का? याविषयी जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांचे फॅक्ट चेक...

जी-20 शिखर परिषद ज्या भारत मंडपम येथे पार पडली. त्या कार्यक्रम स्थळी पाणी साचलं असल्याचं दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासंदर्भात साकेत गोखले @SaketGokhale यांनी ट्वीट केले आहे ते म्हणाले की "एका पत्रकाराने दिलेल्या या व्हिडिओनुसार, आज पावसामुळे G20 शिखर परिषदेचे स्थळ जलमय झाले आहे. 4000 कोटी खर्च केल्यानंतर पायाभूत सुविधांची ही अवस्था आहे. या 4000 कोटींच्या G20 निधीपैकी किती रक्कम मोदी सरकारने लाटली? असा सवाल त्यांनी या ट्वीट द्वारे उपस्थित केला आहे.

तर Nimo Tai @Cryptic_Miind यांनी देखील अधिकृत ट्विटरवरून पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, "भारत मंडपम येथे मशीन वापरून पाणी काढले जात आहे. तुम्ही गरिबी लपवू शकता. पण तुमची अक्षमता कशी लपवणार? असा सवाल उपस्थित हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

तर आता यावर पीआयबीने देखील यावर खुलासा केला आहे PIB Fact Check @PIBFactCheck

यावर ट्वीट करत खुलासा केला आहे. यावर त्यांनी सांगितले आहे की, G20 शिखर परिषदेच्या ठिकाणी पाणी साचल्याचा दावा अतिशयोक्तीपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे. रात्रभर पडलेल्या पावसानंतर पंपाद्वारे पाणी काढण्यात आले. त्यानंतर मोकळ्या भागातील पाणी त्वरीत साफ करण्यात आल्याची माहिती पीआयबीने दिली.

पीआयबीने म्हटले की,G20 शिखर परिषदेच्या ठिकाणी पाणी साचल्याचा दावा एका व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मात्र हा दावा अतिशयोक्तीपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे. तसेच रात्रभर पडलेल्या पावसानंतर तातडीने कारवाई करत पंपांद्वारे पाणी काढण्यात आले. मोकळ्या भागातील किरकोळ साचलेले पाणी त्वरीत साफ करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमस्थळी पाणी साचलेले नाही.

अशा पद्धतीचं ट्वीट हे PIB ने केलं आहे. रात्रीच्या पावासामुळे पाणी साचलं होतं. ते काही वेळात काढण्यात आलं. मात्र भारताची प्रतिमा ठरवणाऱ्या भारत मंडपम येथे काही वेळासाठी का होईना पण पाणी साचलं असल्याचं एक प्रकारे पीआयबीने केलेल्या खुलाशात म्हटले आहे. त्यामुळे पीआयबीने दावा फेटाळला असला तरी त्यांनी पाणी साचल्याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.

Tags:    

Similar News