Fact Check : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या पत्रकार परिषदेत पुलवामा हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये २००७ चा व्हिडिओ दिसला

Update: 2025-05-08 16:15 GMT

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यानंतर जोरदार प्रत्युत्तर देत ६ आणि ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळं नष्ट केली. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी माहिती देण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ७ मे रोजी सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेचं लाईव्ह प्रक्षेपण प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो ऑफ इंडिया च्या (PIB) वतीनं करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत पीआयबीनं २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये एका रस्त्यावर स्फोट झाल्याचं दाखवण्यात आलं. याच व्हिडिओमध्ये स्क्रीनवर ‘पुलवामा अटैक, २०१९’ आणि ४० मृत, ५ घायल’ असं लिहिण्यात आलं होतं.

Delete Edit

वस्तुस्थिती काय ?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओबाबत ऑल्ट न्यूजनं २०२० मध्येच फॅक्ट चेक करणारं आर्टिकल लिहिलं होतं. त्यामध्ये हा व्हिडिओ २००८ मध्ये युट्युबवर पोस्ट केल्याचं म्हटलं होतं. कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ इराकचा असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

या युट्युब व्हिडिओच्या स्क्रीनवर ९ फेब्रुवारी २००८ अशी तारीख असून दुपारी ३ वाजून ५५ मिनिटं अशी वेळ लिहिलेली आहे. याचाच अर्थ व्हायरल होणारा हा व्हिडिओ २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा असूच शकत नाही.

Delete Edit

९ फेब्रुवारी २००७ मध्ये इराकमध्ये असा कुठला हल्ला झाला होता का ? याविषयी ऑल्टन्यूज ने यासंदर्भात पडताळणी केली. त्यात ऑल्ट न्यूजला ब्रिटिश सरकारच्या वेबसाईटमध्ये ऑपरेशन इराक च्या दरम्यान मृत्यू झालेल्या ब्रिटिश नागरिकांसंदर्भात माहिती मिळाली. या माहितीनुसार ९ फेब्रुवारी २००७ रोजी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात प्रायव्हेट ल्यूक डैनियल सिम्पसन, प्रथम बटालियन, यॉर्कशायर रेजिमेंट जखमी झाले होते, नंतर त्यांचा मृत्यू झाला होता.

Delete Edit

मात्र, ऑल्ट न्यूज या गोष्टीचा दावा करत नाही की हा व्हिडिओ त्याच हल्ल्याचा आहे. एवढं मात्र नक्की आहे की हा व्हिडिओ २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्लाचा नाही आहे.

(https://www.altnews.in/hindi/sindoor-operation-pib-press-briefing-used-2007-video-while-showing-pulwana-attacks-in-2019/)

Tags:    

Similar News