FACT Check : बांग्लादेशच्या हिंदूंनी जगाला मदत मागितलीच नाही, AI निर्मित व्हिडिओ व्हायरल

FACT Check: Hindus of Bangladesh did not ask the world for help, AI-generated video goes viral

Update: 2025-12-29 12:55 GMT

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक मुलगा ब्लॉगिंग करतांना दिसतोय. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये दुकानांना आग लागलेली दिसतेय. याच व्हिडिओत ब्लॉगिंग करणारा मुलगा म्हणतोय, “ हा बांग्लादेश आहे, सध्या रात्र झालीय, दीपू ‘चादर’ सारखं आम्हांलाही संपवून टाकतील, तुम्ही स्वतः पाहू शकता काय होतंय ते, या व्हिडिओला जास्तीत-जास्त शेअर करा, जेणेकरुन कुणीतरी आम्हांला वाचवू शकेल. समजत नाहीये की, सगळं काही अचानक कसं काय बिघडलं”

भक्त प्रल्हाद नावाच्या एका यूजर ने व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की, बांग्लादेशातील हिंदू देशाला मदतीसाठी विनवण्या करत आहेत. कारण की, बांग्लादेशातल्या इस्लामी दहशतवाद्यांनी त्यांची घरं आणि दुकानं पेटवून दिली आहेत.




 माजी IPS अधिकारी संजय दीक्षित यांच्या द जयपूर डायलॉग्ज या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हाच व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. बांग्लादेश हातून निघत चालल्याचं दीक्षित यांनी लिहिलं होतं.


नेहमीच चुकीची माहिती धार्मिक एंगलसोबत पसरविणाऱ्या @BattaKashmiri ने व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की, “ बांग्लादेशी हिंदु हे चांगलं डिजर्व करतात, जागा हिंदुंनो.


 



 


अच्युतम नावाच्या यूजर ने हाच व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, “ बांग्लादेशचा हिंदू रोज मरतोय. आता तिथला हिंदुही विचारतोय, आम्हांला कोण वाचवणार ?”




 

FACT CHECK :

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या की फ्रेम्स ला गुगल रिवर्स इमेज मध्ये ऑल्ट न्यूजनं सर्च केलं. त्यानंतर कळालं की, हा व्हिडिओ कुलदीप मीना नावाच्या यूजर ने इंस्टाग्राम वर २४ डिसेंबर २०२५ रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर कुलदीप मीनाचं प्रोफाईल तपासण्यात आलं. त्यानं अशाच पद्धतीचे कित्येक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केल्याचं स्पष्ट झालं. या व्हिडिओमध्ये कुलदीप मीनानं स्वतःला बांग्लादेशी असल्याचं दाखवलंय.

 

Full View

एका व्हिडिओमध्ये कुलदीप मीना म्हणतोय की, बांग्लादेशमध्ये त्याचं घर जाळून टाकण्यात आलंय. मात्र, प्रत्यक्षात कुरदीप मीनाच्या अकाऊंटवर इतर पोस्ट पाहिल्यानंतर लक्षात येतं की, तो भारतीय असून राजस्थानचा रहिवाशी आहे. त्याचं इंस्टाग्राम अकाऊंट हे ‘Based in India’ आहे.


वर दिसत असलेला व्हिडिओ मीना यानं आपल्या इंस्टाग्राम चैनलवर शेअर करत लिहिलंय की, “ हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं बनवलाय.



 



कुलदीप मीना यानं आपल्या इंस्टाग्राम चैनलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं एडिट केलेले कित्येक व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. त्यातल्याच एका व्हिडिओमध्ये तो आपल्या मागे समुद्रात बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाला दाखवतोय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं Sora OpenAI असं लिहिलंय. यातून स्पष्ट होतंय की, हे व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं एडिट करण्यात आले आहेत.


 



 

 

ऑल्ट न्यूजनं याच व्हिडिओच्या अनुषंगानं कुलदीप मीनासोबत संवाद साधला. त्यात कुलदीपनं मान्य केलं की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं त्यानं हे व्हिडिओ बनविलेले आहेत. अशा पद्धतीनं संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ बनविणे हा गुन्हा नसल्याचा दावा कुलदीपनं केलाय. बांग्लादेशच्या लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे, जो तिथले लोकं करु शकत नसल्याचं बालिश वक्तव्य कुलदीपनं केलंय.

कित्येक युजर्सने भारतीय नागरिक कुलदीप मीना द्वारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीनं बनविण्यात आलेल्या व्हिडिओलाच शेअर करत दावा केलाय की, या व्हिडिओच्या माध्यमातून बांग्लादेशातील हिंदू हे मदतीसाठी जगाला विनवण्या करत आहे. 

Tags:    

Similar News