Maharashtra महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या यात्रांपैकी एक Nanded नांदेड जिल्ह्यातील Malegaon Yatra माळेगाव यात्रा...ही यात्रा (खंडोबा देवस्थानची वार्षिक यात्रा) आता फक्त धार्मिक किंवा व्यापारी उत्सव म्हणून नव्हे, तर हिजरा Transgender Community (किन्नर/ट्रान्सजेंडर) समाजाशी जोडलेल्या विशेष ओळखीमुळेही चर्चेत आहे. या यात्रेची ओळख 'हिजड्यांची यात्रा' म्हणून लोकप्रिय झाली. या यात्रेत किन्नर समाज मोठ्या संख्येने सहभागी होतो, विशेषतः धार्मिक विधी, आशीर्वाद देणे, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय असतात. ही परंपरा अनेक दशकांपासून चालत आली असून, यात्रेच्या काही विशिष्ट दिवसांमध्ये किंवा ठिकाणी हा समाज विशेष आकर्षण ठरतो.
यात्रेच्या पारंपरिक वैशिष्ट्यांमध्ये पालखी सोहळा, घोडेस्वारी, पशुप्रदर्शन, कुस्ती दंगल, लोककला सादरीकरण आणि व्यापारी बाजार यांचा समावेश असतो. मात्र, किन्नर समाजाच्या सहभागामुळे यात्रेला एक वेगळे सामाजिक- सांस्कृतिक आयाम मिळाले आहे. अनेक भाविक आणि स्थानिक लोकांच्या मते, हा समाज येथे पूर्ण स्वातंत्र्याने आणि आदराने सहभागी होतो, जे इतर ठिकाणी कमी दिसते. प्रत्यक्षात ही यात्रा कशी असते? तेथील स्थानिक या यात्रेकडे कसे पाहतात? तसेच किन्नर समाज आपल्या या यात्रेशी असलेली नाळ कशा पद्धतीने सांगतात आणि अनुभवतात? या सगळ्याचा आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्रचा ग्राऊंड रिपोर्ट पुन: प्रकाशित करत आहोत.