आज देशातला तरुण रस्त्यावर का उतरलाय? शेतकऱ्यांनी वर्षभर सिंघु बॉर्डरवर ठिय्या का मांडला होता? नोटबंदीने सर्वसामान्य माणूस रस्त्यावर का आला? GST ला व्यापाऱ्यांचा विरोध कशासाठी? देशातील संविधानिक संस्थांची स्वायतत्ता धोक्यात आहे का? भारत खरचं 'विश्वगुरू' बनतोय का? शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न 'जुमला' आहे का? देशातील वाढता धार्मिकवाद अस्थिरता, वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टीने संविधानिक आणि लोकशाही मूल्यांची लोककल्याणकारी राज्यासाठी आवश्यकता आहे का? या सर्व विषयांची तपशीलवार आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे सिनियर स्पेशल कोरोस्पाँडंट विजय गायकवाड यांच्यासोबत माजी कुलगुरू, नियोजन आयोगाचे सदस्य आणि खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या स्पेशल मुलाखतीमधे...