शेतकरी विम्यातील जाचक अटी काढा, खासदार ओमराजे निंबाळकर लोकसभेत गरजले

Update: 2021-02-13 15:14 GMT

प्रधानमंत्री पीक वीमा योजनेअंतर्गत अनेक वीमा कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. हाच धागा पकडत उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात 14 लाख 53 हजार 540 शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून 1112 कोटींचा प्रिमिअम पीक वीमा भरला होता. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र, 3 लाख 11 हजार 420 शेतकऱ्यांनाच केवळ 104 कोटी रुपयांची वीमा कंपन्यांनी मदत केली आहे.

विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत ऑनलाईन तक्रार करायची अट यामध्ये आहे. पावसाने ज्या भागात 7 ते 8 दिवस लाईट नसेल. अशा भागातील शेतकऱ्यांनी 72 तासात कशी तक्रार करायची? असा सवाल करत ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत वीमा कंपन्यांच्या विरोधात आवाज उठवला. तसंच खासगी वीमा कंपन्यापेक्षा सरकारी कंपन्यांना वीमा घेण्याची परवानगी द्यावी आणि शेतकरी विम्यातील जाचक अटी काढून टाकाव्या अशी मागणी केली आहे. पाहा काय म्हणाले ओमराजे निंबाळकर....

Tags:    

Similar News