''पुलवामा तेव्हाच घडतो जेव्हा निवडणुका असतात..''अनुपा आचार्य

Update: 2022-12-02 13:20 GMT

अग्निवीर योजना ही फसवणूक आहे. त्यांचेच लोक भरती करण्याची ही योजना आहे. जसे हिटलरने एसएस आर्मी तयार केली त्याने आपल्याच लोकांना एन्ट्री दिली होती. अशा प्रकारचाच हा प्रकार आहे. यात केवळ लष्कराचेच नुकसान नाही, तर तरुणांचेही नुकसान झाले आहे. त्यांना माजी सैनिकांसारखा सन्मान मिळणार नाही. भाजपने ज्या प्रकारे आपला छद्म राष्ट्रवाद चालवून देशभक्तीचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, तो अत्यंत चुकीचा मार्ग आहे. स्टार्टअप नेशन हे पुस्तक, इस्रायलसाठी लिहिलेले आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत स्टार्टअपची ही यशोगाथा होती.

70 लाख लोकसंख्येचे इस्रायलचे मॉडेल आपल्या 135 कोटी लोकसंख्येच्या देशात, विचार न करता, चर्चा न करता लागू करणे म्हणजे जनतेला कमकुवत करणे आहे. यामुळे लष्कराचे नुकसान होईल. तरुणांचे नुकसान होईल. त्याला सैनिकाचा मान मिळणार नाही. सरकारने फक्त 26 राफेल खरेदी केली आणि त्यांची फक्त भरपूर प्रचार केली. एवढ्यावर आपण शत्रूच्या सैन्याचा सामना कसा करू शकतो का? या सरकारने वन रँक, वन पेन्शन लागू केली नाही. इतकाच काय पुलवामा तेव्हाच घडतो जेव्हा निवडणुका असतात, तेव्हाच आपल्या लष्करी तळांवर वारंवार हल्ले होतात. हा योगायोग आहे की आणखीन काय? असं मत आज झालेल्या पत्रकार परिषेदेत काँग्रेसच्या नेत्या व माजी विंग कमांडर अनुपा आचार्य यांनी व्यक्त केलं आहे.


Full View

Tags:    

Similar News