कंगना रणौतचं समर्थन करणाऱ्या विक्रम गोखलेंना शरद पवारांचा टोला, म्हणाले...

Update: 2021-11-15 10:37 GMT

कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे देशभरात देशाच्या स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्याने देशात नवा वाद निर्माण झाला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तिच्या या वक्तव्याला आता अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील समर्थन दिलं आहे.

या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी या दोघांनाही चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले... 'ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात, अशांच्या अशा वक्तव्यांची नोंद सुद्धा घ्यावी असं मला वाटतं नाही. त्याची नोंद आपण घेऊ नये. शेवटी समाजात असे काही लोक असतात. शेवटी समाजात ज्याला इंग्रजीमध्ये परवर्ट (pervert) म्हणतात अशी एक मनोवृत्ती असते. म्हणून त्याची आपण दखल घ्यायची नसते. सोडून द्यायचं असतं". असा टोला पवार यांनी लगावला आहे.Full View

Tags:    

Similar News