Ajit Pawar : राष्ट्रवादीचे 'दादा' नॉट रिचेबल? राज्यात नव्या भूकंपाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'दादा' म्हणून ओळखला जाणारा बडा नेता सध्या नॉट रिचेबल असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Update: 2023-04-08 03:10 GMT

NCP leader Ajit pawar not rechable with Seven MLA Maharashtra Politics News

राज्यात झालेल्या राजकीय भुकंपाला (Political Earthquake) नऊ महिने पूर्ण झाले नाहीत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 'दादा' नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आताही राज्यात पून्हा दुसरा राजकीय भूकंप होणार का? याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) शुक्रवारी सकाळी पुण्यातील कार्यक्रमात होते. मात्र त्यावेळी अजित पवार यांना शरद पवार यांचा फोन (Sharad pawar call to Ajit pawar) आला. त्यानंतर अजित पवार यांनी दिवसभराचे सगळे कार्यक्रम रद्द केले. तसेच आपला कॉनवॉय आणि स्टाफ सोडून अजित पवार खासगी गाडीने बारामतीच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र रात्री ऊशीरापर्यंत अजित पवार त्यांच्या किंवा शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले नाहीत. त्याबरोबरच अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले. मात्र अजित पवार यांच्यासोबत सात आमदारसुध्दा आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Ajit pawar Not reachable)

ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांनी हिंडेनबर्गच्या (Hindenburg) मुद्द्यावर अदानींना पाठींबा दिल्यानंतर ती मुलाखत व्हायरल होत आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीला मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आपले सगळे कार्यक्रम रद्द करून नॉट रिचेबल झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे चर्चांच्या केंद्रस्थानी असतात.

अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल असले तरी ते आज पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजर राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांची नाराजी नेमकी का आहे? अजित पवार यांची नाराजी राज्यात भूकंप घडवणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजित पवार माध्यमांसमोर आल्याशिवाय मिळणार नाहीत. मात्र शरद पवार यांनी अदानींना पाठींबा दिला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांचा धुराळा जोरात उडत आहे.

Tags:    

Similar News