कांजूरमार्गची जागा मेट्रोसाठीच- देवेंद्र फडणवीस

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे सरकारने कांजूरमार्ग येथे हलवलेल्या मेट्रो कारशेडला स्थगिती देऊन हा प्रकल्प आरे येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता आरे पाठोपाठ कांजूरमार्गची जागाही मेट्रोसाठीच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

Update: 2022-08-12 05:50 GMT

शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या काळात कांजूरमार्ग येथे हलवलेला कारशेडचा प्रकल्प पुन्हा आरे येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान मेट्रो कारशेडसाठी आरे पाठोपाठ कांजूरमार्ग येथील जागा मागितली असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीच मागितली आहे. मात्र त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर ही जागा मेट्रो ३ साठी मागितली नाही तर ती मेट्रो ६ साठी मागितली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो ३ साठी योग्य नाही, असा अहवाल ठाकरे सरकार आणि आमच्या काळातील कमिटीने केला. तसेच ठाकरे सरकारने नेमलेल्या कमिटीने ही जागा मेट्रो तीन साठी योग्य नसल्याचा अहवाल दिला. तसेच कारशेड आरेमध्येच योग्य असून ते कांजूरमार्गला नेल्यास त्याचा मोठा खर्च वाढेल आणि हा प्रकल्पाला चार वर्षे लागतील. त्यामुळे हा प्रकल्प आरे येथे करण्याचा निर्णय घेतला. मात्र ठाकरे सरकारने कांजूरमार्ग धरून ठेवल्याचे फडणवीस म्हणाले.

कांजूरमार्गच्या जागेचा वाद सुरू आहे. तर आता आरेमध्ये एकही झाड तोडण्याची आवश्यकता नसून तेथे 29 टक्के काम पुर्ण झाले आहे. याबरोबरच एकूण प्रकल्पाचे 85 टक्के काम पुर्ण झाले आहे. त्यानंतरही हा प्रकल्प रद्द त्यावर आणखी 15-20 हजार कोटींचा भार टाकणं, हे योग्य नाही. हे पैसे कुणाच्या खिशातील आहेत? असा सवाल करत हे जनतेच्या खिशातील पैसे आहेत, असंही फडणवीस म्हणाले. त्यामुळे हे पैसे वाया जाऊ देणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

Tags:    

Similar News