ठाकरे सेनेचा दसरा मेळावा मिक्स विचारांचा – गुलाबराव पाटील

Update: 2022-09-20 06:02 GMT

सध्य़ा राज्यात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावरुन दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल तर आमचा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावापासून तर चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगरपर्यंत 70 किलो मीटरपर्यंत त्यांचा रोड शो होणार आहे. एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


Full View

Tags:    

Similar News