उध्दव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला न्याय मिळवण्याचा मार्ग

Update: 2023-02-18 07:40 GMT

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. हा उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उध्दव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde) यांच्या गटाने शिवसेना पक्ष (Shivsena party) आणि चिन्हावर दावा केला होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलला. त्यावर सुनावणी होऊन निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. हा उध्दव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उध्दव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. पण पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. या त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. उध्दव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले तरच त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

Tags:    

Similar News