Silver Price Prediction ; चांदी ६ लाखांवर जाणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा

Update: 2025-12-26 09:46 GMT

'रिच डॅड पुअर डॅड' (Rich Dad Poor Dad) या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी चांदीबाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

शुक्रवारी, २६ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने ७५ डॉलरचा टप्पा ओलांडला असताना, कियोसाकी यांनी दावा केला आहे की चांदीची ही वाढ इथेच थांबणार नसून, ती एका ऐतिहासिक शिखराकडे निघाली आहे.

भारतात चांदी ६ लाखांच्या घरात?

कियोसाकी यांच्या मते, २०२६ मध्ये चांदीचे दर $२०० प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात. जर आपण याचे भारतीय रुपयांत रूपांतर केले, तर हे आकडे डोळे विस्फारणारे आहेत.

सध्याचा भाव: $७५ (आंतरराष्ट्रीय) = भारतीय MCX वर अंदाजे २.३२ लाख रु. प्रति किलो.

कियोसाकींचे टार्गेट: $२०० (आंतरराष्ट्रीय) = जर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव $२०० वर गेले, तर भारतीय चलनात आणि कर (Taxes) पकडून चांदीचा भाव ६ लाख प्रति किलो च्या घरात जाण्याची शक्यता आहे.

सध्याच्या भावापासून ही वाढ जवळपास १६७% इतकी प्रचंड असेल.

चांदीची खरी तेजी आता सुरू झालीय

'X' (ट्विटर) वर पोस्ट करताना कियोसाकी म्हणाले, "मला विश्वास आहे की चांदीची घौडदौड नुकतीच सुरू झाली आहे. $७० ते $२०० हे २०२६ मधील वास्तव असू शकते.

$२०० हे अशक्य नाही, याची अनेक कारणे माझ्याकडे आहेत."


१९६५ चा दाखला आणि गुंतवणुकीचा सल्ला

आपल्या अनुभवाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, "मी १९६५ पासून चांदी खरेदी करत आहे. तेव्हा चांदीचा भाव $१ पेक्षाही कमी होता. आज भाव इतके वाढले असतानाही मी खरेदी सुरूच ठेवली आहे."

अभ्यास करून गुंतवणूक करा

कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना आंधळेपणाने गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे. "माझे ऐकून निर्णय घेऊ नका, तर स्वतः अभ्यास (Research) करा. जेव्हा तुम्ही अभ्यासाअंती निर्णय घेता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत होता," असे मत त्यांनी व्यक्त केले.

चांदीने ४६ वर्षांतील रेकॉर्ड तोडले

२०२५ हे वर्ष चांदीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. या वर्षात चांदीने तब्बल १५८% परतावा दिला आहे, जो १९७९ नंतरचा (गेल्या ४६ वर्षांतील) सर्वात मोठा वार्षिक परतावा आहे. पुरवठ्यातील तुटवडा आणि जागतिक आर्थिक संकटांमुळे चांदीने सोन्यापेक्षाही (Gold)

चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

Tags:    

Similar News