विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

538
What is the status of cotton purchase?
Courtesy: Social Media

कोरोनाच्या (Corona) संकटामुळे वर्धा (Wardha)जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पण यामुळे वर्धा जिल्हयाला लागून असलेल्या गावांमधील शेतकरी वर्ध्याच्या बाजारपेठेत कापूस (Cotton) विक्रीला आणू शकत नव्हते. पण या शेतकरी वर्गाचे नुकसान होऊ नये़ यासाठी इतर जिल्हयातील कापूस विक्री करण्यासाठी जिल्हयात प्रवेश करु देण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी परवानगी दिली आहे.

वर्धा जिल्हयाच्या हद्दीला लागून असलेल्या जिल्हयातील अनेक गावांमधील शेतकरी कापुस विक्रीसाठी वर्धा जिल्ह्यात येतात. पण जिल्हाबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे या शेतक-यांना कापुस विक्रीकरीता वर्धा जिल्हयामध्ये प्रवेश मिळतो नव्हता. या शेतक-यांचे नुकसान होऊ नये याकरीता जिल्हाधिकारी यांनी सशर्त परवानगी दिली आहे.

कापूस विक्रीसाठी जिल्ह्याबाहेरील शेतक-यांसाठी अटी

1 . आठवड्यातून 1 दिवस कापुस वाहतुकीची वाहने बाहेरील जिल्हयातून एकाच जिनिंगमध्ये येतील.

2. कापुस वाहतुक करणारे वाहन वर्धा जिल्हयात प्रवेश केल्यानंतर ज्या जिनिंगमध्ये जाणार आहे. त्या व्यवस्थापनाने जिनिंगच्या आवारात असे वाहन आल्यानंतर वाहनासोबत आलेल्या व्यक्तीची उतरण्याची व बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थितीत या व्यक्ती स्थानिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावीत.

3.जिनिंगच्या आवारात वाहन आल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करावे.

हे ही वाचा…


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

महाराष्ट्र कोरोनावरील लस विकसित करणार, 30 माकडांवर प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, ‘हे’ आहे कारण…

‘निसर्ग’ संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

4. खरेदी केंद्रावर व्यवस्था असल्याची खातरजमा केल्यानंतर दुस-या जिल्हयातील कापुस विक्रीस करणा-या शेतक-यांना जिल्हा उपनिबंधक परवानगी देतील.

5 . स्थानिक मजुरांच्या सहाय्याने कापुस उतरवण्याची व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थितीत बाहेर जिल्हयातुन आलेले मजूर या कामाकरीता वापरता येणार नाहीत.

6. ज्या दिवशी बाहेर जिल्हयातील वाहनाने कापुस सबंधित सुत गिरणीमध्ये येणार असेल त्या दिवशी कृषि विभागाचे कर्मचारी , अधिकारी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण व निरिक्षण करण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणुन नियुक्त केले जातील.

7. बाहेर जिल्हयातील कापुस खरेदी करीता निश्चित केलेल्या दिवशी अशा जिनिंगच्या परिसरात वैद्यकिय पथकाची नेमणुक करण्यात येऊन या पथकामार्फत वाहनासोबत आलेल्या व्यक्ती तसेच स्थानिक मजूर या सर्वाची तपासणी करण्यात येईल.

8. कापुस वाहतुकरीता येणारे वाहन कोणत्याही परिस्थितीत 4 तासाच्या आत वर्धा जिल्हयातून बाहेर जाईल याची नियंत्रण अधिकारी म्हणुन नेमणूक केलेल्या कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

9. संबधीत जिनिंग व्यवस्थापनाने गेटजवळ हँड वॉश सेंटरची उभारणी करावी.

10.संबधितांनी मास्कचा वापर करावा. सोबत पुरेसे सॅनिटायझर ठेवावे.

11.सबंधींतानी आपले मोबाईमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करने बंधनकारक राहील.

या सर्व अटीचा भंग केल्याचे आढळून आल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.