Home > News Update > 'निसर्ग' संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

'निसर्ग' संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

निसर्ग संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!
X

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळाची निर्मिती झाली आहे आणि याच वादळाचे रुपांतर चक्रीवादळात होऊन ते राज्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत हे वादळ अलिबागपासून २५० आणि मुंबईपासून (Mumbai)२९० किलोमीटर दूर होते. तर वादळाचा वेग हळूहळू वाढून ताशी ११० ते १२० होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदवला आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला पाऊसही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा...


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

महाराष्ट्र कोरोनावरील लस विकसित करणार, 30 माकडांवर प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, 'हे' आहे कारण...

३ जून म्हणजे आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत हे वादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान खबरदारीच्या सूचना म्हणून मुंबईत किनारपट्टीच्या भागात सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात वादळाचा धोका असलेल्या ठिकाणा एनडीआरफची (NDRF) पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर मच्छिमारांना सनमुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारीही करण्यात आली आहे.

गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवरही हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

Updated : 3 Jun 2020 12:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top