पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, ‘हे’ आहे कारण…

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाशी संदर्भात जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं. तसं राज्याला केंद्राचं पूर्ण सहकार्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. तसंच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दोनही नेत्यांनी राज्याला मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री