Home > News Update > अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने
X

ज्या राज्यात भाजप चं सरकार नाही. अशा राज्यात राज्य़पाल विरुद्ध राज्यसरकार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता हा संघर्ष महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. बहुतेक वेळा ज्या पक्षाचं सरकार केंद्रात आहे. राज्यपाल त्या पक्षाच्या बाजूनं झुकलेले असतात. असं पाहायला मिळालं आहे. राज्यात ही तसं होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मे ला म्हणजेच दिवसांपुर्वीच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल. असं ट्वीट केल्यानं मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपुर्वीच राज्यातील जनतेला फेसबूक द्वारे संबोधित करताना राज्यातील सर्व विद्यापिठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी अजून गुण मिळवू शकतो, परीक्षा द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी साधारण ऑक्टोबरच्या सुमारास परीक्षा घेण्याची तयारी ठेवत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

मात्र, आज राज्यपालांनी ट्विट केल्यानं विद्यापीठातील अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. त्यातच राज्यपालांनी जर परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

Updated : 2 Jun 2020 6:00 PM GMT
Next Story
Share it
Top