Home > News Update > मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी......Global Ambedkar Special Bulletin

मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी......Global Ambedkar Special Bulletin

max maharashtra special bulletin on global ambedkar mahaparinirvan din

मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी......Global Ambedkar Special Bulletin
X

महापरीनिर्वाणासाठी दरवर्षी मुंबईत शिवाजी पार्क आणि चैत्यभुमीवर ४,५ आणि ६ डिसेंबरला आंबेडकरी अनुयायांचा २०-२५ लाखांचा जनसागर उसळतो. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनानंतर आंबेडकरी अनुयायांनी सुरूवातीला आंबेडकर जयंती, त्यानंतर बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आता 6 डिसेंबर महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने स्वयंशिस्तीतील आदरांजलीच्या दिवसभराच्या घडामोडीचा रिपोर्ट खास मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी......

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलित समाजाचा उद्धार केला असे नाही तर त्यांचे विचार अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे होते. याबद्दलच महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी केलेली मांडणी....

Also Read:महामानवाचे आर्थिक विचार


मी स्वतः बौद्ध आहे. पण माझ्यासाठी बौद्ध असणं ही माझी राजकीय ओळख आहे. पण बौद्ध असल्यामुळे मला रोज उठून अमुक गाथा, पंचशील म्हटलेच पाहीजे हा अट्टाहास माझ्याठायी नाही. किंवा तो बाबासाहेबांच्या विचारधारेतही नव्हता कधीच. बुध्द जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती आहे. नास्तिक असणं ही तर्काने लढण्याची, जगण्याची वृत्ती आहे.. म्हणूनच पाच हजार वर्षांचा बॅकलॉग गेल्या साठ वर्षांत बौद्धांनी निम्म्याहून अधिक फरकाने भरून काढला आहे, सांगतात चळवळीचे‌ अभ्यासक वैभव छाया...

Also Read:धर्मांतर ...


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जागतिक पातळीवर किती महत्त्वाचा आहे आणि तो का महत्त्वाचा आहे, याचे विश्लेषण केले आहे आंबेडकर मिशनच्या दीपक कदम यांनी.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील शासनकर्ती जमात निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. स्वत: एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. पण नोकरीचा राजीनामा देवून त्यांनी शोषित, वंचित आणि बहुजन समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन करून अधिकारी बनवण्याचे मिशन सुरू ठेवले आहे.

Also Read:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक वारसा


आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस आणि पीस ही संस्था बाबासाहेबांच्या प्रेरणेने जगभरात काम करत आहे. भारतात होणाऱ्या मानवी हक्क उल्लंघन, जातीय अत्याचार यावरही ही संस्था काम करते. नागसेन सोनारे हे या संस्थेचे ते भारतातील सल्लागार आहेत. या संस्थेचे काम कसे चालते ते सोनारे यांच्याकडून समजून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....

Also Read:मानवी हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणारा महामानव


जगभरातील मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत त्या देशातील सरकारांचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या लोकांचा संघर्ष जागतिक पातळीवर मांडण्यासआठी आंबेडकर सेंटर फ़ॉर जस्टिस अँड पीस ही संस्था कार्यरत आहेत. या संस्थेचे ग्लोबल प्रेसिडेंट योगेश वऱ्हाडे हे विविध देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणा घेऊन कार्यकत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार ग्लोबल का आहे हे त्यांच्याकडून समजून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....

Also Read:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जागतिक स्तरावर कसा पोहोचला?


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष केला. पण त्यांचा लढा केवळ एखाद्या समाजासाठी होता असे नाही तर त्यांची प्रत्येक चळवळ ही मानवी मुक्तीसाठी कशी महत्त्वाची होती, याचे विश्लेषण केले आहे. लेखक, वक्ते आणि संविधान संवर्धन समिती या संस्थेच्या माध्यमातून संविधाना बाबत जागृतीचे काम करणारे सुरेश सावंत यांनी...

Also Read:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा मानवाच्या मुक्तीसाठी : सुरेश सावंत


या शतकाच्या अखेरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील एकमेव आयकॉन ठरतील, असे भाकीत दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार यांनी केले आहे.

Also Read:डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल का झाले?


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका जातीचे नाहीत तर ते संविधानाचे आहेत, बाबासाहेबांनी समाजाला काय मिळवून दिलं हे कवितेमधून सांगत आहेत तरुण कवी ह्रदयनाथ अशोक....

Also Read:"डॉ. बाबासाहेब कोणत्या जातीचे नाही फक्त संविधानाचे"


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येतात. पण यंदा कोरोनामुळे अनुयायांनी येऊ नये असे आवाहन करण्यात येते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी काव्यांजली वाहिली आहे लोककवी प्रशांत मोरे यांनी....

Also Read:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काव्यांजली


मॅक्स व्हिडीओ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक वारसा

मानवी हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणारा महामानव


करोनाचं सावट; 'या' दिवशी चैत्यभूमीवर 'असं' चित्र कधीच दिसलं नाही


डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिटी ऑफ इंडियाचे प्रतीक | MaxMaharashtra


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जागतिक स्तरावर कसा पोहोचला?


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल का झाले?


ग्लोबल आंबेडकर – आंबेडकरी विचार आणि उद्योजकता


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा मानवाच्या मुक्तीसाठी : सुरेश सावंत


"डॉ. बाबासाहेब कोणत्या जातीचे नाही फक्त संविधानाचे"


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काव्यांजली


आंबेडकरी गाण्यांचा बदलता बाज, उत्कर्ष शिंदेंची खास मुलाखत


Follow us on Telegram

https://t.me/MaxMaharashtra

Subscribe us on

https://www.youtube.com/MaxMaharashtra/

Follow us on Twitter:

https://twitter.com/MaxMaharashtra

Like us on Facebook:

https://www.facebook.com/MaxMaharashtra/

Send your suggestions/Feedback:

[email protected]

Updated : 6 Dec 2020 12:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top