Top
Home > News Update > #positivenews : जगातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली

#positivenews : जगातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली

#positivenews : जगातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली
X

संपूर्ण जगात कोरोनाबाधीत (corona) रुग्णांची संख्या ६५ लाख ६७ हजार एवढी झाली आहे. तर आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ९१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण वर्ल्डोमीटर या संस्थेच्या आकडेवारीनुसार सध्या जगात कोरोनाबाधीत रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

हे ही वाचा...


'निसर्ग'चा जोर ओसरला, आता मुसळधार पावसाचा अंदाज

एक व्हाट्सअप मेसेज, ... मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतोय!

...म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले सर्वांचे आभार

६५ लाख ६७ हजार रुग्णांपैकी ३१ लाख ६८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या जगात कोरोनाबाधीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० लाख १० हजार एवढी झाली आहे. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे एक्टिव्ह रुग्णांपैकी फक्त २ टक्के म्हणजे ५४ हजार २०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर २९ लाख ५६ हजार ३६२ रुग्णांना सौम्य त्रास होतो आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत टॉप १० देशांच्या यादीत ७व्या स्थानी आहे.

Updated : 4 Jun 2020 2:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top