Home > News Update > 20 लाख कोटीच्या पॅकेज मध्ये कोणाला काय मिळालं, जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या 10 मोठ्या घोषणा

20 लाख कोटीच्या पॅकेज मध्ये कोणाला काय मिळालं, जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या 10 मोठ्या घोषणा

20 लाख कोटीच्या पॅकेज मध्ये कोणाला काय मिळालं, जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या 10 मोठ्या घोषणा
X

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्या पॅकेज संदर्भात माहिती दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. दररोज या पॅकेज संदर्भात माहिती दिली जाणार आहे.

MSME सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा समाजातील अनेक वर्गाशी बातचित तयार करुन हे पॅकेज तयार केलं आहे. पॅकेजच्या साहाय्याने देशाचा आर्थिक विकास करायचा आहे. भारताला आत्मनिर्भर करायचं आहे. त्यामुळंच या पॅकेजला आत्मनिर्भर भारत अभियान असं म्हटलं जातं आहे.

आत्मनिर्भर भारत चा अर्थ आत्मविश्वासी भारत आहे, जो भारत स्थानिक स्तरावर उत्पादन करुन जागतिक उत्पादन मदत करेल.

MSME सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. MSME साठी आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 3 लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेज अंतर्गत बिना गॅरंटी कर्ज दिलं जाणार आहे. यासाठी 4 वर्षाची मुदत असणार आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत असेल तसंच या पॅकेजमुळे 45 लाख MSME उद्योगांना फायदा होईल. 1 वर्ष या कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नसेल. अशी माहिती निर्मसा सितारमण यांनी दिली आहे.

जे एमएसएमई उद्योग कोरोना व्हायरस मुळे संकटात आले आहेत. त्यांना त्यांचा व्यवसाय़ वाढवण्यासाठी 20,000 कोटी निधीची मदत केली जाईल. असं देखील निर्मला सितारमण यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं आहे.

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्या पॅकेज संदर्भात अर्थमंत्री निर्मलासितारमण माहिती दिली आहे.

MSME उद्योगांची व्याख्या बदलली

MSME सूक्ष्म, लघु, मध्यम मधील अनेक उद्योग प्रगती करु शकत नव्हते. विशेष म्हणजे त्यांनी प्रगती केल्यानंतर त्यांना सूक्ष्म, लघु, मध्यम अंतर्गत मिळणारे लाभ उलाढाल वाढल्यानंतर बंद होतात. हे उद्योग मोठ्या स्पर्धेत टिकू शकत नव्हते. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली आहे.

नवीन व्याख्येनुसार MSME उद्योगाचे उत्पादन किती आहे. हा निकष बदलण्यात येणार आहे. या उद्योगांच्या उलाढालीनुसार तसंच त्यांनी केलेली गुंतवणूक याचा विचार करुन या उद्योगाची वर्गवारी… सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा स्वरुपात करण्यात येईल. हेच नियम सेवा उद्योगालाही लागू करण्यात येतील अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली आहे.

हे ही वाचा...


Live : अर्थमंत्री निर्मला सितारमण: 20 लाख कोटी रुपयांच्या पोतडीत गरीबांसाठी नक्की काय?

MSME साठी तीन लाख कोटी रुपये: निर्मला सितारमण

MSME उद्योगांची व्याख्या बदलली: निर्मला सितारमण

१० कोटीपर्यंत गुंतवणूक असली तरी लघु उद्योग मानला जाईल... उद्योगाच्या फायद्यासाठी उद्योगाच्या व्याख्येत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. १० कोटीपर्यंत गुंतवणूक असली तरी लघु उद्योग मानला जाईल. २०० कोटीपर्यंतचे सरकारी टेंडर स्थानिक पातळीवरच भरता येणार.

Income tax return भरण्याची डेडलाईन वाढवण्यात आली आहे. आता इन्कम टॅक्स 31 जुलै न भरता 30 सप्टेंबर ला भरण्यासाठी मुदत दिली आहे. अशाच प्रकारे विश्‍वास स्‍कीम ची डेडलाइन 31 डिसेंबर 2020 केली आहे. अगोदर ती 30 जून पर्यंत होती.

टॅक्स भरणाऱ्यांना 31 मार्च 2021 पर्यंत टीडीएस मध्ये 25 टक्के सुट देण्यात आली आहे. सरकार टीडीएस (TDS) च्या माध्यमातून टॅक्स जमा करत असते. टीडीएस वेगवेगळ्या पद्धतीने कापला जातो. जसं की, पगार किंवा एखाद्या गुंतवणूकीवर मिळणाऱ्या व्याजावर/ कमिशनवर देखील टीडीएस कापला जातो.

15 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ईपीएफ #EPF ऑगस्ट पर्यंत केंद्र सरकार भरणार, यासाठी साधारण पणे 2500 कोटी रुपयांचा खर्च येणार: निर्मला सितारमण

वीज वितरण कंपन्यांना मदत म्हणून तात्काळ 90,000 कोटी रुपये दिले जाणार. नॉन बॅकिंग फायनान्स कंपन्यासाठी, मायक्रो फायनान्स कंपन्यासाठी विशेष योजना आणली जाणार. यामध्ये 30 हजार कोटींची विशेष मदत केली जाणार आहे. यामुळे या क्षेत्रातील खेळत्या पैश्याचा प्रश्न मिटून जाईल.

200 कोटी पर्यंतच टेंडर जागतिक नसेल. हे MSME साठी मोठं पाऊल मानलं जात आहे. याशिवाय एमएसएमई ला ई-मार्केट शी जोडलं जाणार आहे. सरकार एमएसएमई चे राहिलेली रक्कम 45 दिवसाच्या आत परत करणार

Updated : 13 May 2020 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top