MSME साठी तीन लाख कोटी रुपये: निर्मला सितारमण

MSME सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. MSME साठी आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 3 लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेज अंतर्गत बिना गॅरंटी कर्ज दिलं जाणार आहे. यासाठी 4 वर्षाची मुदत असणार आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत असेल तसंच या पॅकेजमुळे 45 लाख MSME उद्योगांना फायदा होईल. 1 वर्ष या कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नसेल. अशी माहिती निर्मसा सितारमण यांनी दिली आहे.

जे एमएसएमई उद्योग कोरोना व्हायरस मुळे संकटात आले आहेत. त्यांना त्यांचा व्यवसाय़ वाढवण्यासाठी 20,000 कोटी निधीची मदत केली जाईल. असं देखील निर्मला सितारमण यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं आहे

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्या पॅकेज संदर्भात अर्थमंत्री निर्मलासितारमण माहिती देत आहेत.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती.