Home > News Update > Live : अर्थमंत्री निर्मला सितारमण: 20 लाख कोटी रुपयांच्या पोतडीत गरीबांसाठी नक्की काय?

Live : अर्थमंत्री निर्मला सितारमण: 20 लाख कोटी रुपयांच्या पोतडीत गरीबांसाठी नक्की काय?

Live : अर्थमंत्री निर्मला सितारमण: 20 लाख कोटी रुपयांच्या पोतडीत गरीबांसाठी नक्की काय?
X

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज संदर्भात माहिती देत आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्या संदर्भात आज त्या पत्रकार परिषदेत घेत आहे.

दरम्यान हे आर्थिक पॅकेज कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, देशातील मध्यम वर्गासाठी आणि उद्योगांना चालना देण्यासाठी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

त्यामुळं ‘आत्मनिर्भर भारत’ या आर्थिक पॅकेज मध्ये गरीब आणि वंचित वर्गासाठी नक्की काय आहे? हे पाहणं महत्वाचं आहे.

हे ही वाचा...

MSME साठी तीन लाख कोटी रुपये: निर्मला सितारमण

समाजातील अनेक वर्गाशी बातचित तयार करुन हे पॅकेज तयार केलं आहे. पॅकेजच्या साहाय्याने देशाचा आर्थिक विकास करायचा आहे. भारताला आत्मनिर्भर करायचं आहे. त्यामुळंच या पॅकेजला आत्मनिर्भर भारत अभियान असं म्हटलं जातं आहे. निर्मला सितारमण

आत्मनिर्भर भारत चा अर्थ आत्मविश्वासी भारत आहे, जो भारत स्थानिक स्तरावर उत्पादन करुन जागतिक उत्पादन मदत करेल: निर्मला सितारमण

दररोज या पॅकेज संदर्भात माहिती दिली जाणार: निर्मला सितारमण

15 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ईपीएफ #EPF ऑगस्ट पर्यंत केंद्र सरकार भरणार, यासाठी साधारण पणे 2500 कोटी रुपयांचा खर्च येणार: निर्मला सितारमण

Updated : 13 May 2020 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top