Home > News Update > MSME उद्योगांची व्याख्या बदलली: निर्मला सितारमण

MSME उद्योगांची व्याख्या बदलली: निर्मला सितारमण

MSME उद्योगांची व्याख्या बदलली: निर्मला सितारमण
X

MSME सूक्ष्म, लघु, मध्यम मधील अनेक उद्योग प्रगती करु शकत नव्हते. विशेष म्हणजे त्यांनी प्रगती केल्यानंतर त्यांना सूक्ष्म, लघु, मध्यम अंतर्गत मिळणारे लाभ उलाढाल वाढल्यानंतर बंद होतात. हे उद्योग मोठ्या स्पर्धेत टिकू शकत नव्हते. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली आहे.

नवीन व्याख्येनुसार MSME उद्योगाचे उत्पादन किती आहे. हा निकष बदलण्यात येणार आहे. या उद्योगांच्या उलाढालीनुसार तसंच त्यांनी केलेली गुंतवणूक याचा विचार करुन या उद्योगाची वर्गवारी... सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा स्वरुपात करण्यात येईल. हेच नियम सेवा उद्योगालाही लागू करण्यात येतील अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली आहे.

१० कोटीपर्यंत गुंतवणूक असली तरी लघु उद्योग मानला जाईल

उद्योगाच्या फायद्यासाठी उद्योगाच्या व्याख्येत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. १० कोटीपर्यंत गुंतवणूक असली तरी लघु उद्योग मानला जाईल. २०० कोटीपर्यंतचे सरकारी टेंडर स्थानिक पातळीवरच भरता येणार.

#MSME मधील नवीन निकष पुढील प्रमाणे आहेत....

Updated : 13 May 2020 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top