कोरोनाचे संकट आणि अंधश्रद्धेचा ‘धुरळा’

जळगाव जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ८०० च्या वर गेली आहे तर मृतांचा आकडा १०० च्या पुढे गेला आहे. संकट गंभीर झाले असताना आता जिल्ह्यात मात्र वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचे (corona) संकट जावे यासाठी अनेक भागात लोक होम हवन करु लागले आहेत. इथे सध्या लोक धुराळा होम हवन करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगावात ( jalgaon) याचा जोरदार प्रचारही सुरू आहे.

हे ही वाचा…


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

महाराष्ट्र कोरोनावरील लस विकसित करणार, 30 माकडांवर प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, ‘हे’ आहे कारण…

‘निसर्ग’ संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

हळद , ओवा , कापूर, मोहरी , गाईचे तुप , लोभान कडुनिंबाची पानांद्वारे हा धुराळा जळगावच्या अनेक भागातील काही चौकात तसंच घरासमोर , गच्चीवर नागरिक करतांना दिसून येत आहेत. श्रद्धा की अंधश्रद्धा यावरही सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाचा विषाणू हा कोणत्याही आवाजाने, प्रकाशाने किंवा धुरामुळे रोखला जाऊ शकत नाही हे याआधीच सिद्ध झाले आहे. तरीही लोकांनी आता हा धुराळा होम सुरू केला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.