Home > Top News > नमो टीव्ही आठवतोय का ?

नमो टीव्ही आठवतोय का ?

नमो टीव्ही आठवतोय का ?
X

तोच लोकसभा निवडणुकीपूर्वी आकाशात धुमकेतू उगवावा. तसा उगवलेला नमो टीव्ही. पैसे न घेता ( फ्री टू एअर ) असलेला नमो टीव्ही.

निवडणूक संपली, टीव्ही गायब झाला. निवडणूक आयोगाला केलेल्या खुलाशात (आणि हो, लेखी उत्तरात) बीजेपी आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी हे मान्य केलं की नमो टीव्ही हे भाजपच अपत्य होतं. त्यासाठी भाजपने सगळी व्यवस्था केलेली होती.

मात्र, या नमो टीव्हीसाठी भाजपने ना कुठल्या सरकारी परवानग्या काढलेल्या ना उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी परवानगी घेतलेली. सय्या भये कोतवाल तो डर काहेका? खरी गंमत पुढेच आहे.

हे ही वाचा...

मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

15 ऑगस्टच्या आधी या देशात येणार कोरोनावरील लस

अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीच्या नियमात सुधारणा

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के

निवडणूक संपल्यावर नमो टीव्ही गायब झाला आणि निवडणूक आयोगाला भाजपने सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात नमो टीव्ही चा खर्च म्हणून एक नया पैशाचा उल्लेख नाहीये. या टीव्ही साठी लागणारी माणसं, त्यांचा खर्च, स्टुडीओ, प्रक्षेपणाचे साहित्य, कसलाही खर्च भाजपने निवडणूक खर्चात दाखवलेला नाही.

ही सगळी यंत्रणा फुकट भाजपला उभारून देणारा दानशूर नेमका कोण आहे? की नेहमीप्रमाणे नजरचुकीने उल्लेख राहून गेलाय की पुरवणी खर्चाची कागद निवडणूक आयोगाला पूर्वलक्षी प्रभावाने सादर केली जातील? हे निवडणूक गैरप्रकार, आर्थिक भ्रष्ट्राचार की अजून कशात मोडत माहित नाही. मात्र प्रकरण आहे. असं आहे.

साकेत गोखलेंनी हे खणून काढलेलं आहे. राज्य सरकारने त्यांना पुन्हा संरक्षण द्यावं अशी विनंती लगेचच करून टाकतो.अजून किती अच्छे दिन पाहिजेत रे तुम्हाला?

#नमोटीव्हीघोटाळा

Updated : 8 Aug 2020 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top