Home > News Update > अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा...शिष्यवृत्तीच्या नियमात सुधारणा

अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा...शिष्यवृत्तीच्या नियमात सुधारणा

अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा...शिष्यवृत्तीच्या नियमात सुधारणा
X

अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत होता. पण आता हा अडसर दूर केला आहे. परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल आणि त्या विद्यार्थ्याने आधी घेतलेले पदवी शिक्षण इतर शाखेचे असले तरी त्याला आता परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

हे ही वाचा...

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के

खासगी रुग्णालयांवर भरारी पथकांचा वॉच

कोरोनावरील लसीची किंमत ठरली !

या शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तरसाठी ३५ वर्षे तर पीएचडी साठी ४० वर्षे अशी वयोमर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी समाज कल्याण आयुक्तालयामार्फत अर्ज मागवण्यात आले आहेत. १४ ऑगस्ट पर्यंत असलेली त्याची मुदतही वाढवण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज दाखल करणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई – मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारावेत असेही सांगण्यात आले आहे.

Updated : 8 Aug 2020 1:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top